शुक्रवार, 26 डिसेंबर 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

1600 कोटी कमाई करणार्‍या बाहुबली-2 वर पुस्तकंदेखील

Bahubali-2 the conclusion income
बाहुबली-2 म्हणजेच बाहुबली द कनक्ल्युजन हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर रोजच वेगवेगळे रेकॉर्ड करताना दिसत आहे. या चित्रपटानं 25 दिवसांमध्ये 1600 कोटी रूपयांची कमाई केली आहे. बाहुबली चित्रपटगृहांमध्ये असाच कायम राहिला तर लवकरच 2000 कोटी रूपयांची कमाई करणारा हा पहिलाच चित्रपट ठरेल. 
28 एप्रिल रोजी प्रदर्शित झालेल्या या‍ सिनेमात प्रभास, राणा दग्गुबाती, अनुष्का शेट्टी, तमन्ना, राम्या कृष्णन आणि सत्यराज यांच्या प्रमुख भूमिका आहेत. दिग्दर्शक एस. एस. राजामौलींनी पडद्यावर उतरवलेला बाहुबली भावला असेल किंवा तुम्ही वाचनप्रिय व्यक्ती असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. बाहुबली आता लवकरच पुस्तकरूपातही वाचकांच्या समोर येणार आहे. हिंदी, तमिळ, मल्याळम् आणि तेलुगू भाषेत ही पुस्तकं उपलब्ध होणार आहेत. तीन पुस्तकांच्या सीरिजमध्ये ही पुस्तकं वेस्टलँड घेऊन येणार आहे.
 
द राईज ऑफ शिवगामी असं या सीरिजमधल्या पहिल्या भागाचं नाव असेल. हे पुस्तक आनंद नीलकांतन यांनी लिहिलंय. या पुस्तकात शिवगामीचं लहानपण आणि कटप्पा या पुस्तकातले मुख्य भागांपैकी एक असतील.