मंगळवार, 28 नोव्हेंबर 2023
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : सोमवार, 4 ऑक्टोबर 2021 (12:24 IST)

ब्रेकिंग न्यूज : आर्यन ने कबूल केले की तो गेल्या 4 वर्षा पासून ड्रग्स घेत आहे,शाहरुखच्या घरावर छापा पडण्याची शक्यता

अभिनेता शाहरुख खानच्या मुलाला मुंबईतील क्रूज ड्रग्स पार्टी प्रकरणात NCB कडून अटक करण्यात आली आहे. सध्या तो पोलीस कोठडीत आहे.आज त्याला जामीन मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान त्याने आपल्या वडिलांशी फोन वरून गोष्टी केल्या. आर्यन ने पोलिसांसमोर कबुली केली आहे की तो गेल्या 4 वर्षांपासून ड्रग्स घेत आहे. या प्रकरणात आर्यनसह आणखी 3 जणांना अटक करण्यात आली. आर्यनच्या व्हॉट्सअॅप चॅटचीही चौकशी करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे, ज्यात ड्रग्जशी संबंधित धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत
मीडिया रिपोर्टनुसार, आर्यन खानच्या चौकशीदरम्यान त्याच्या व्हॉट्सअॅप चॅटचीही चौकशी करण्यात आली. दरम्यान, आजपर्यंतच्या अहवालानुसार आर्यनवर ड्रग्जचे सेवन केल्याचा आरोप आहे. मात्र, आर्यनवर ड्रग्ज खरेदी आणि विक्रीचा आरोप असल्याचा दावा अनेक मीडिया रिपोर्टमध्ये केला जात आहे. एका वृत्तपत्राच्या अहवालानुसारआर्यन खानसोबत चौकशीदरम्यान त्याच्या व्हॉट्सअॅप चॅटचीही चौकशी करण्यात आली. रिपोर्टनुसार, फोनवरून असे समोर आले आहे की आर्यन नियमितपणे ड्रग्जची ऑर्डर देत होता आणि त्याचे सेवनही करत होता.
 
काय आहे संपूर्ण प्रकरण
समोर आलेल्या माहितीनुसार,आर्यनकडून मोठ्या प्रमाणात ड्रग्सचा साठा मिळाला आहे . ज्याची किंमत 133,000 रुपये आहे. या प्रकरणी अटक केलेल्यांवर कलम 8 सी, 20 बी, 27, 35 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आली आहे. क्रूझवर रेव्ह पार्टी करण्याबाबत एनसीबीच्या अधिकाऱ्यांना माहिती मिळाली होती. त्यानंतर ऑपरेशन दरम्यान असे आढळून आले की या पार्टीमध्ये ड्रग्जचा वापर अंधाधुंदपणे केला जात आहे. या पार्टीमध्ये एनसीबीचे अधिकारी प्रवासी म्हणून गेले होते.
 
एनसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात शाहरुख खानच्या घराची झडती देखील होऊ शकते. आर्यन कडून मोठ्या प्रमाणात ड्रग्सचा साठा मिळाला आहे त्यामुळे आता शाहरुखच्या घरावर मन्नत वर देखील छापा पडू शकतो .