सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 13 एप्रिल 2022 (08:16 IST)

शंकर महादेवन यांनी गायला ब्रेथलेस हनुमान चालीसा

Breathless Hanuman Chalisa sung by Shankar Mahadevan
प्रख्यात प्लेबॅक सिंगर आणि उत्कृष्ट कंपोजर शंकर महादेवन यांनी स्वत:ची आगळी मुद्रा उमटवली आहे. त्यांनी एकाहून एक खास गाणी देत रसिकांच्या मनात आपले खास स्थान निर्माण केले आहे. शंकर महादेवन यांना आजवर अनेकानेक पुरस्कारांनी सन्मानित केले गेले आहे. लोक त्यांच्या संगीतासाठी जीव टाकतात. केवळ भारतातच नाही तर जगभरात त्यांच्या संगीताने त्यांना ओळख आणि प्रेम दिले आहे.अनेक वर्षांपूर्वी शंकर यांनी गायकीमध्ये एक अभिनव प्रयोग करत श्वास न घेता अर्थात ब्रेथलेस (Breathless) ही संकल्पनेची बॉलीवुडमध्ये सुरुवात केली होती. त्यांचा ब्रेथलेस संकल्पनेवरचा अल्बम कमालीचा लोकप्रिय झाला होता.


आता तसाच श्वास न घेता म्हणलेला पहिला ब्रेथलेस  हनुमान चालीसा व्हीडियो शंकर यांनी रसिकांसाठी आणला आहे. त्यांचा हा व्हीडियो शेमारू भक्तीच्या अकाउंटवरून शेयर केला गेला आहे.या व्हीडिओमध्ये शंकर महादेवन अद्भुत हनुमान चालीसा गाताना दिसत आहेत. हा हनुमान चालिसा एकदमच ब्रेथलेस आहे. ही वेगवान रचना गायला अतिशय कठीण आहे.