Ranbir Alia Marriage: रणबीर कपूरचा बंगला लग्नासाठी सजला, लग्नाची तयारी सुरू!
आलिया भट्ट आणि रणबीर कपूरच्या लग्नाबाबत दोघांच्याही कुटुंबीयांनी मौन बाळगले असले तरी लवकरच घरात सनई चौघडे वाजणार आहे. गुजरातमधील रणबीर कपूरच्या कृष्णा राज बंगल्याची सजावट सुरू झाली असून संपूर्ण बंगला सुंदर रोषणाईने सजवण्यात आला आहे. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या लग्नामुळे ही सजावट केली जात असल्याचे मानले जात आहे. मात्र, याबाबत अद्याप अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही.
बंगल्याला नव्या नवरी प्रमाणे सजवल्याचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे ज्यामध्ये कारागीर सजावट करताना दिसत आहेत. एका रिपोर्टनुसार, या सजावटीचा लग्नाच्या तारखेचा संबंध आहे, रणबीर कपूर आणि आलिया भट्ट 14 एप्रिल रोजी लग्नबंधनात अडकणार आहेत. वेडिंग प्लॅनर नेमण्याऐवजी आलियाच्या मॅनेजरने लग्नाच्या तयारीची संपूर्ण जबाबदारी घेतली आहे.
रिपोर्टनुसार, लग्नाला फक्त 50-60 लोक उपस्थित राहतील आणि त्यानंतर होणाऱ्या समारंभात एकूण 100 लोकांना आमंत्रित केले जाईल. हे लग्न अगदी नॉन-ग्लॅमराइज ठेवण्यात येणार असून आलिया-रणबीर एका छोट्याशा समारंभा प्रमाणे लग्न करणार असल्याची माहिती आहे.
आलिया भट्ट लग्नात गुलाबी रंगाचा लेहेंगा घालू शकते जे सुप्रसिद्ध डिझायनर सब्यसाचीने डिझाइन केले आहे. रणबीर कपूरच्या आउटफिटबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. लग्नाचे फोटो लीक करणे खूप कठीण होईल कारण पाहुण्यांना त्यांचे फोन ठेवण्याची परवानगी दिली जाणार नाही. तसेच सुरक्षा व्यवस्थाही अत्यंत कडेकोट असणार आहे.