शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 8 एप्रिल 2022 (20:21 IST)

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट या दिवशी सात फेरे घेतील,

आतापर्यंत रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या लग्नाबाबत अनेक अटकळ बांधल्या जात होत्या. पण आता त्यांच्या लग्नाच्या वृत्ताला पुष्टी मिळाली आहे. आलियाचे काका रॉबिन भट्ट यांनी लग्नाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. रिपोर्टनुसार, हे जोडपे 15 एप्रिलला लग्नबंधनात अडकणार आहेत. आलियाचे अंकल रॉबिन हे बॉलीवूडचे प्रसिद्ध लेखक आहेत आणि महेश भट्ट हे ही भाऊ आहे.  त्यांनी सांगितले की, हे जोडपे लग्नबंधनात अडकणार आहे. लग्नाचे सोहळे चार दिवस चालणार आहेत.
 
काकांना आमंत्रण मिळाले
आलिया भट्टच्या काकांनी दोघांच्या लग्नाच्या वृत्ताला दुजोरा दिला आणि सांगितले की, त्यांना लग्नाचे आमंत्रणही मिळाले आहे. त्यानुसार बॉलीवूडचे 'पॉवर कपल' पुढील आठवड्यात लग्नबंधनात अडकणार आहे. दोघांचे चाहते त्यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत. आलिया-रणबीरच्या लग्नाच्या चर्चा सुरू झाल्यापासून सोशल मीडियावर दोघांचे व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत आहेत.
 
आई नीतूनेही तयारी केली
आई नीतू कपूरनेही मुलगा रणबीरच्या लग्नाची तयारी पूर्ण केली असून आता ती सून आलियाच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहे. नीतू कपूरने प्रसिद्ध डिझायनर मनीष मल्होत्राच्या स्टोअरमधून स्वत:साठी कपडे निवडले आहेत.
 
रणबीर-आलिया 15 एप्रिलला लग्नबंधनात अडकणार आहेत. याच्या दोन दिवस आधीपासून दोघांच्याही घरी लग्नाच्या विधी सुरू होतील. रिपोर्ट्सनुसार, या जोडप्याचे लग्न अतिशय खाजगी ठेवण्यात येणार आहे, जेणेकरून फोटो लीक होऊ नये. लग्नानंतर रणबीर-आलियाचे रिसेप्शन सांताक्रूझ येथील ग्रँड हयात हॉटेलमध्ये होणार आहे.
 
जोडपे हनिमूनला जाणार नाहीत
रिपोर्ट्सनुसार, रणबीर-आलिया लग्नानंतर हनीमूनला जाणार नाहीत. सध्या दोघंही आपापल्या चित्रपटात खूप व्यस्त आहेत आणि त्यामुळे दोघेही लग्नानंतर कामावर परतणार आहेत.