शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : बुधवार, 5 ऑक्टोबर 2022 (12:49 IST)

अल्लू अर्जुनवर पोलिसांची करावाई

allu arjun
तुम्ही साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुनला त्याच्या 'पुष्पा: द राइज' चित्रपटात अनेक कायदे तोडताना पाहिले असेल. आता अलीकडे अल्लू अर्जुन म्हणजेच 'पुष्पराज'ने खऱ्या आयुष्यातही एक कायदा मोडला, त्यामुळे तो आता कायदेशीर अडचणीत सापडला आहे. रिपोर्ट्सनुसार, अल्लू अर्जुनने नुकतेच ट्रॅफिक नियमांचे उल्लंघन केले आहे. त्यानंतर अल्लू अर्जुनला हैदराबाद पोलिसांनी पकडले आणि शेवटी त्याला दंडही ठोठावण्यात आला.
 
अल्लू अर्जुनला 700 रुपये दंड भरावा लागला
 रिपोर्टनुसार अल्लू अर्जुनला ट्रॅफिकचे नियम मोडल्याबद्दल दंड भरावा लागला. हैदराबाद पोलिसांनी त्याच्या लँड रोव्हर रेंज रोव्हर लक्झरी एसयूव्ही कारला दंड ठोठावला आणि अभिनेत्याला 700 रुपये दंड भरावा लागला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काळ्या काचा असलेल्या कारमध्ये असलेल्या अल्लू अर्जुनला पोलिसांनी हैदराबादमधील बिझी सेंटरजवळ थांबवले. कारण अशा काचेच्या खिडक्यांना भारतात बंदी आहे. असे असूनही, अनेक सेलिब्रिटी अशा कारचा वापर करतात. पण, सेलेब्सकडेही पोलिस हलगर्जीपणा करत नाहीत. सामान्य असो की विशेष हैदराबाद पोलीस प्रत्येकाचे सारखेच चालान कापतात.