गुरूवार, 8 जानेवारी 2026
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 7 जुलै 2017 (08:44 IST)

तब्बल 4 कोटीची गाडी रणवीरची वाढदिवसाची खरेदी

Ranveer's birthday

रणवीर सिंहचा 32 वा वाढदिवसाच्या दिवशी तब्बल 4 कोटी रुपयांची पांढऱ्या रंगाची एस्टन मार्टिन ही आलिशान कार विकत घेतली. ही कार घेतल्यानंतर लगेचच रणवीर वरळीत दीपिका पदुकोणच्या घरी पोहोचला. दीपिकाला आपली नवी कोरी कार दाखवून रणवीरने तिला ताज हॉटेलमध्ये डिनरसाठी नेले.

रणवीरच्या मागावर असलेल्या काही चाहत्यांनी ही गोष्ट नेमकी हेरली. ताज हॉटेलजवळही या “लव्ह बर्डस’ना बघून अनेक फॅन एकत्र झाले. या गर्दीपासून स्वतःचा चेहरा लपवण्याचा प्रयत्न दीपिकाने केला. मात्र अनेक मोबाईलनी या दोघांची एकत्र छबी टिपलीच. आता या दोघांच्या डिनर डेटविषयी आणि रणवीरच्या नव्या कोऱ्या एस्टन मार्टिन कारविषयी सगळ्यांच्याच उत्सुकता चाळवल्या गेल्या.