सेन्सॉर बोर्ड आॅनलाइन झाले
चित्रपटांमधील आक्षेपार्ह भागांवर कात्री चालविणारे पर्यायाने बॅन करणारे सेन्सॉर बोर्डाने पेपरलेस होण्याचे ठरवले असून आता सर्व प्रोसेस आॅनलाइन पद्धतीने फॉलो केली जाणार आहे.
केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू आणि बोर्डाचे अध्यक्ष पहलाज निहलानी यांनी गेल्या सोमवारी हा नवा नियम लागू केल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे कुठल्याही चित्रपटाला सर्टिफिकेट मिळवण्यासाठी आॅनलाइन पद्धतीने बोर्डाकडे प्रोसेस करावी लागणार आहे.