राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेते दिग्दर्शक कुमुद चौधरी यांचा आगामी चित्रपट 'छोटे नवाब'चा ट्रेलर रिलीज झाला आहे. 'छोटे नवाब' रिलीज होण्याआधीच खूप चर्चेत आहे. हा चित्रपट 'द इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ सिनसिनाटी' 2020 मध्ये प्रदर्शित करण्यात आला, या कार्यक्रमात छोटे नवाबने 2020 चा सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मचा पुरस्कार जिंकला. आता हा चित्रपट प्रेक्षकांसाठी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे.
छोटे नवाब'चा ट्रेलर निर्मात्यांनी सारेगामा म्युझिकच्या यूट्यूब चॅनलवर रिलीज केला आहे. ट्रेलरमध्ये अक्षय ओबेरॉय, प्लाबिता बोरठाकूर आणि स्वर कांबळे दिसत आहेत. ट्रेलरची सुरुवात ब्रिटनमध्ये राहणारा 13 वर्षीय जुनैद लखनऊमधील त्याच्या वडिलोपार्जित नवाबी हवेलीला भेट देण्यासाठी येतो. यानंतर लग्न, प्रेम आणि कुटुंबातील हार्टब्रेक अशी कथा पुढे सरकते. हा चित्रपट 23 फेब्रुवारी 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
छोटे नवाब'चा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्साह वाढला आहे. चित्रपटाची कथा आणि पटकथा अर्शद जाफरी यांनी लिहिली आहे, तर त्याचे संवाद गौरव शर्मा यांनी लिहिले आहेत. 'छोटे नवाब'ची निर्मिती विक्रम मेहरा आणि सिद्धार्थ आनंद कुमार यांनी केली आहे.