सोमवार, 30 जानेवारी 2023
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated: सोमवार, 24 मे 2021 (10:39 IST)

प्रियांका चोप्राचा BBMAमध्ये थाई-हाई स्लिट गाऊनमध्ये स्टनिंग अवतार, फोटो पाहा

Photo : Instagram
मुंबई बॉलीवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) आता ग्लोबल आयकॉन बनली आहे. बीबीएमए (Priyanka Chopra in BBMA) मधील प्रियांका चोप्रा आपल्या जबरदस्त अभिनय आणि लुकमुळे लाखोंच्या मनावर राज्य करते. तिच्या अभिनयाबरोबरच तिची फॅशनेबल स्टाइल बर्याचदा चर्चेत असते. आता पुन्हा असेच काहीसे पुन्हा पाहिले जात आहे. यावेळी बिलबोर्ड म्युझिक अवॉर्ड्स 2021 मध्ये प्रियंका चोप्रा तिच्या लुकमुळे चर्चेत आहे. बिलबोर्ड म्युझिक अवॉर्डास 2021 (Billboard Music Awards 2021) ची रविवारी रात्री जोरदार सुरुवात झाली. 
 
लॉस एंजेलिसमध्ये झालेल्या या अवॉर्ड फंक्शनमध्ये प्रियंका चोप्राच्या लुकची चर्चा झाली.  
 
यादरम्यान प्रियंका चोप्रा अतिशय स्टायलिश लुकमध्ये दिसली.  
 
बिलबोर्ड संगीत पुरस्कार 2021 साठी प्रियंका चोप्राने थाई-हाय स्लिट गाऊन निवडले.
 
 प्रियांका डोल्स अँड गब्बानाच्या डीप नेक गाउनमध्ये खूपच सुंदर दिसत होती. तिनी बेल्ट आणि काही अॅक्सेसरीजसह आपले लुक कंप्लीट केले होते.   
 
या गाऊनमध्ये प्रियंका चोप्राची स्टाइल पाहायला मिळत होती.
 
 2021 बिलबोर्ड संगीत पुरस्कारांमध्ये निक जोनास यांनी त्याचे भाऊ केविन आणि जो जोनास आणि डीजे मार्शमेलो यांच्यासह परफॉर्मेंस केले. यावेळी प्रियंका चोप्रा देखील त्यांच्यासोबत होती. 
 
 या संगीत पुरस्कार कार्यक्रमात परफॉर्मेंस शिवाय, निक जोनस या कार्यक्रमाचे होस्ट आणि प्रतिनिधी देखील आहेत.