मंगळवार, 5 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By
Last Modified: बुधवार, 7 एप्रिल 2021 (13:04 IST)

अंड्याने मिळवा चमकदार त्वचा, फेसपॅक तयार करणे अगदी सोपे

अंड्याला सुपरफूड म्हटलं जातं. याचा पांढरा भाग मिनरल्स, व्हिटॅमिन्स आणि प्रोटीनने भरपूर असतं ज्याने त्वचेवरील डाग नाहीसे होतात. अंडं केवळ शरीरासाठीच नव्हे तर स्किन आणि केसांसाठी देखील फायद्याचं असल्याचे मानले जाते. अंड्याने चेहर्‍याची सुंदरता वाढते. जाणून घ्या कशा प्रकारे अंडा चेहर्‍यासाठी फायदेशीर आहे ते-
 
अँटी एजिंग फेस पॅक
अंड्याचा पांढरा भाग अँटी एजिंग ट्रीटमेंटसाठी वापरला जातो. यासाठी एक चमचा अंड्याचा पांढरा भाग घ्या त्यात 2 थेंब सुंगधी एसेंशियल ऑयल मिसळा. आता याला चेहर्‍यावर लावा. याने त्वचेवरी फाइन लाइन्स नाहीश्या होतील आणि त्वचा टाईट होण्यास मदत होईल.
 
डाग मिटविण्यासाठी एक चमचा अंड्याच्या पांढर्‍या भागात एक चमचा साखर आणि एक चमचा कॉर्न स्टार्च मिसळा. याने चेहर्‍यावरील ब्लॅकहेड्स नाहीशे होतील. आपली त्वचा तेलकट असल्यास आपण यात एक चमचा‍ लिंबाचा रस आणि मध मिसळू शकता. याने चेहर्‍यावरी घाण स्वच्छ होते आणि चेहरा चमकदार होतो.