चमकत्या त्वचेसाठी या फळांचे साल वापरा
उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेणं आवश्यक आहे. पाण्याची कमी आणि उष्ण वारंमुळे त्वचा रुक्ष आणि निस्तेज होऊ लागते. त्वचेची चमक नाहीशी होते. त्वचेची चमक पुन्हा मिळावी या साठी काही नैसर्गिक उपाय करून आपण त्वचेची चमक पुन्हा मिळवू शकता. या साठी काही फळांच्या सालीचा वापर करायचा आहे. चला तर मग जाणून घेऊ या.
1 कलिंगडाचे साल -त्वचेवर लाल पुरळ होत असल्यास कलिंगडाची साल त्वचेवर चोळा. खरूज असल्यास कलिंगडाच्या सालीला वाळवून जाळून भुकटी बनवून तेलात मिसळून लावा.
* पपईचे साल-उन्हाळ्यात चेहऱ्याची त्वचा कोरडी पडू लागते. या मुळे चेहऱ्यावर सुरकुत्या येतात. या साठी चेहऱ्यावर पपईचे साल लावा. याचा दररोज वापर केल्याने चेहरा उजळतो.कारण या मध्ये व्हिटॅमिन सी चे प्रमाण आढळतात.
* केळीचे साल - चकाकती त्वचा पाहिजे असल्यास दिवसातून 5 मिनिट केळीचे साल चेहऱ्यावर चोळा. केळीच्या सालात अनेक गुण आढळतात. या मध्ये व्हिटॅमिन बी 6 ,बी 12, कार्बोहायड्रेट आणि अँटी ऑक्सीडेन्ट आढळतात. जे चेहऱ्यावरील मृत त्वचेला काढून टाकतात.
* संत्रीचे साल- उन्हाळ्यात संत्रीचे साली वाटून बारीक भुकटी बनवून पेस्ट लावल्याने चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स नाहीसे होतात आणि चेहऱ्या वर चमक येते. संत्रींमध्ये व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ए आढळते. जे त्वचेला तरुण बनवून ठेवते.
* डाळिंबाचे साल- डाळिंबाचे साल तव्यावर भाजून घ्या आणि थंड झाल्यावर मिक्सर मध्ये वाटून पेस्ट बनवून घ्या. ही पेस्ट दिवसातून किमान एकदा तरी चेहऱ्यावर लावा. असं केल्याने त्वचेवरील मुरूम, सुरकुत्या आणि मृत त्वचा नाहीसे होतात कारण डाळिंबात अँटीऑक्सीडेंट आढळतात या मुळे त्वचा चमकदार दिसते.