मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By
Last Modified: शुक्रवार, 2 एप्रिल 2021 (10:10 IST)

गुलाबी ओठांसाठी तिळाचं तेल प्रभावी, काळ्या ओठांपासून मुक्ती

त्वचेची निगा राखताना ओठांकडे दुर्लक्ष करु नये. कोणत्याही मोसमध्ये ओठांची काळजी घेणे आवश्यक आहे. ओठांना ड्रायनेस व टॅनिंगपासून वाचवणे आवश्यक असतं. ओठांची काळजी घेतली नाही तर ओठ काळे पडू लागतात.
 
ओठांची निगा राखण्यासाठी लिप बाम वापरणे अगदी सामान्य आहे. परंतू बाजारात ‍मिळणार्‍या लिप बाममुळे ओठ काळे होऊ लागतात. आपण देखील ओठांच्या काळपणामुळे त्रस्त असाल तर तिळाचं तेल वापरावं. जाणून घ्या कशा प्रकारे ओठ गुलाबी करता येतील-
 
हळद व तिळाचं तेल
अर्धा चमचा तिळाचं तेल व चिमूटभर हळद घ्या. एका बाउलमध्ये हे मिसळून घ्या. हे मिश्रण ओठांवर लावा. 30 मिनिटानंतर पाण्याने स्वच्छ करुन घ्या. टॅनिंगमुळे ओठ काळे झाले असल्यास नैसर्गिक रंग पुन्हा येईल.
 
तिळ व नारळाचं तेल
एक लहान चमचा तिळाचं तेल व अर्धा चमचा नारळ तेल घ्या. एका वाटीत दोन्ही मिसळून घ्या. आता हे मिश्रण ओठांवर लावा. दिवसातून दोनदा याने ओठांवर मालिश करा. याने काळपटपणा दूर होईल. रात्री झोपण्यापूर्वी ओठांवर हे लिप मास्क लावा. ओठ गुलाबी होतील.