शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By
Last Modified: शनिवार, 16 जानेवारी 2021 (10:00 IST)

ओठ गुलाबी आणि सुंदर दिसावे अशी इच्छा असल्यास हे करुन बघा

हळद आणि शुद्ध तूप हे वापरुन ओठ मऊ ठेवता येऊ शकतात. यासाठी एक चमचा शुद्ध तूप घेऊन त्यात चिमूटभर हळद मिसळा. हे मिश्रण ओठांवर लावून रात्रभर देखील ठेवू शकता. यावर लिप बाम किंवा पेट्रोलियम जेली लावू शकता. तुपाचा सुगंध सहन होत नसल्या यात मधाचे थेंब देखील मिसळू शकता. तुपाने नैसर्गिक गुलाबीपणा येईल आणि हळद काळपटपणा दूर करण्यास मदत करेल.
 
या शिवाय आपण आंघोळ केल्यानंतर नाभीमध्ये मोहरीच्या तेलाचे काही थेंब सोडल्याने देखील फायदा मिळेल.
 
आपण घरी स्क्रब देखील तयार करु शकता. समप्रमाणात वाटलेली साखर आणि ऑलिव्ह ऑइल मिसळून हे ओठांवर लावावे. दोन मिनिटाने कोमट पाण्याने धुवून घ्यावे. नंतर लिप बाम लावू शकता.