शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By
Last Modified: मंगळवार, 29 डिसेंबर 2020 (17:10 IST)

केस गळती थांबविण्यासाठी होममेड हेयर मास्क

आजच्या काळात ताण-तणाव, प्रदूषण, चुकीचे खाणे-पिणे आणि अशा बऱ्याच समस्यांचे परिणाम केसांवर दिसून येतात. बरेच लोक असे आहे ज्यांचे केस अकाली पडण्यास सुरू होतात. ज्यामुळे तारुण्यातच टक्कल पडू लागते. केसांच्या गळतीचा त्रास महिलांनाच नव्हे तर पुरुषांना देखील सहन करावा लागतो. केस प्रत्यारोपण किंवा हेयर ट्रान्सप्लांटची पद्धत खूपच महाग आहे. असे दिसून येतं की जेव्हा अश्या प्रकारचा त्रास सुरू होतो, लोक वेगवेगळ्या प्रकारे केसांची निगा राखण्याच्या उत्पादनांचा वापर करतात पण या मुळे अपेक्षित परिणाम मिळत नाही. अशा परिस्थितीत घरातच काही गोष्टींच्या मदतीने हेयर मास्क बनवू शकता. हे हेयर मास्क आपल्या केसांच्या मुळाला बळकट करतात, ज्यामुळे केस गळतीची समस्या मोठ्या प्रमाणात कमी होते. चला तर मग जाणून घेऊ या घरात बनलेल्या हेयर मास्क विषयी.

* अंडी मास्क -
केसांचे तज्ज्ञ म्हणतात की अंडीमध्ये प्रथिनांसह व्हिटॅमिन बी देखील आढळत, जे केसांना पोषण देण्यासह आरोग्य देखील सुधारतो. केसांची गळती थांबवून त्यांची वाढ करायची असेल तर अंडीच्या मास्क चा वापर केसां मध्ये जरूर करावा.हे मास्क बनविण्यासाठी सर्वप्रथम एका अंड्याला फोडून फेणून घ्या.या मध्ये एका कप दूध,दोन चमचे लिंबाचा रस आणि दोन मोठे चमचे ऑलिव्ह तेल घालून मिसळून घ्या. आता हे केसांना आणि स्कॅल्प ला लावा आणि शॉवर कॅप घालून अर्धा तास तसेच राहू द्या. नंतर साध्या पाण्याने धुऊन घ्या.
 
* दह्याचा मास्क -   
केसांची निगा राखणाऱ्या तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार दही हे केसांच्या वरदानापेक्षा काहीच कमी नाही.हे केसांच्या गळतीच्या समस्येला दूर करून केसांना पोषण देऊन मॉइश्चराइझ देखील करतो. दह्याचा मास्क बनविण्यासाठी एक कप दही घेऊन त्यामध्ये एक मोठा चमचा सफरचंदाचे व्हिनेगर आणि एक चमचा मध घालून चांगल्या प्रकारे मिसळा. हे केसांना चांगल्या प्रकारे लावा आणि 15 मिनिटे तसेच ठेवा. नंतर थंड पाण्याने धुऊन घ्या.
 
* ग्रीन टी हेयर मास्क -
ग्रीन टी अँटी ऑक्सीडेन्ट ने समृद्ध आहे आणि या मध्ये ईजीसीजी (एपिगैलोकैटेचिन−3−गॅलेट)आढळते जे केसांच्या वाढीस मदत करतात. हे मास्क बनविण्यासाठी एका अंड्याला फोडून त्यामध्ये दोन मोठे चमचे ग्रीन टी घाला आणि तो पर्यंत मिसळा जो पर्यंत एक क्रिमी टेक्स्चर बनत नाही. आता एका ब्रश च्या साहाय्याने केसांना लावा आणि 15 -20 मिनिटे असेच राहू द्या. नंतर थंड पाण्याने धुऊन घ्या.