Keratin Hair Treatment काय आहे जाणून घ्या
केस कोरडे फ्रिजी किंवा कुरळे असतील तर त्यासाठी केराटीन उपचारांबद्दल आपण ऐकलेच असेल. पार्लर मध्ये देखील फ्रिजी आणि कुरळे किंवा कर्ली केसांपासून मुक्त होण्यासाठी केराटीन उपचार करण्याचा सल्ला दिला जातो. आपल्याला माहित आहे का की अखेर हे उपचार आहे तरी काय आणि ह्याचे फायदे आणि तोटे काय आहेत ? चला तर मग आम्ही सांगत आहोत की केराटीन उपचार काय आहे ते जाणून घेऊ या.
केराटीन उपचार काय असतं -
फ्रिजी आणि रुक्ष केसांना मऊ आणि सरळ करण्यासाठी केराटीन उपचार केले जाते. केराटीन आपल्या केसां मधील असलेले नैसर्गिक प्रथिने आहे. ज्या मुळे आपल्या केसांमध्ये चमक येते, पण प्रदूषण आणि रसायने आणि सतत उन्हात राहिल्याने केसांची ही चमक नाहीशी होते. ज्यामुळे केस रुक्ष, खराब आणि निस्तेज दिसतात, तसेच केसांची चमक देखील कमी होते. म्हणून केसांच्या नैसर्गिक प्रथिनांना पुन्हा मिळवण्याच्या या उपचारालाच केराटीन प्रोटीन ट्रीटमेंट असे म्हणतात. या उपचारामध्ये कृत्रिम केराटीन टाकले जाते आणि असं केल्याने आपले केस मऊ आणि चमकदार होतात. सध्याच्या काळात हे ट्रीटमेंट खूप प्रख्यात आहे.
केराटीनचे काय फायदे असतात -
* केराटीन ट्रीटमेंट किंवा उपचार केल्यानं केस चमकदार होतात आणि केस स्ट्रेट होऊ लागतात.
* केसांमध्ये कमी गुंता होतो. जेणे करून आपण आपले केस सहजपणे व्यवस्थित ठेवू शकता.
* प्रदूषणापासून केस वाचतात.
* केस मऊ होतात त्यामुळे केसांमध्ये गुंता होत नाही आणि केस तुटत देखील नाही.
* मऊ आणि सरळ झाल्यामुळे आपण केसांची कोणती ही हेअर स्टाइल करू शकता.
* केसांना वारंवार घरातच हेअर स्ट्रेनरने स्ट्रेट करण्याची गरज भासत नाही. या मुळे आपला वेळ देखील वाचतो.
केराटीन केल्याचे दुष्परिणाम जाणून घ्या-
* केराटीन प्रोटीन ट्रीटमेंट केल्यावर आपल्याला पार्लर मधूनच स्पेशल शॅम्पू आणि कंडिशनर वापरण्याचा सल्ला दिला जातो या शिवाय आपण कोणतेही दुसरे उत्पादक वापरू शकत नाही.
* केराटिन केल्यावर केस पूर्णपणे स्ट्रेट दिसतात त्यामधून वॉल्यूम आणि बाउन्स नाहीसे होतात.
* केस खूप लवकर तेलकट होतात ज्यामुळे केसांना वारंवार शॅम्पू करावं लागतं.
* या उपचारावर खूप पैसे खर्च होतात असं करून देखील ह्याचा परिणाम केवळ 5 ते 6 महिन्यांपर्यंतच असतो.