हिवाळ्यात कोंड्याच्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी उपाय
हिवाळ्यात डोक्यातील कोंडा होणं ही समस्या सर्वात सामान्य आहे. हे केवळ आपल्या केसांनाच नुकसान देत नाही तर आपल्याला लाजिरवाणी देखील करते. हे दूर करण्यासाठी केमिकल असलेले शॅम्पू, कंडिशनर वापरण्या ऐवजी इतर काही उपाय केल्यानं केसांच्या नुकसानाला टाळता येऊ शकत. चला जाणून घेऊ या काही टिप्स.
1 खोबरेल तेल -
खोबरेल तेल कोंड्यासाठी एक उत्कृष्ट उपाय आहे. अंघोळीच्या पूर्वी 4 -5 चमचे नारळाच्या तेलाने मॉलिश करावी आणि 1-2 तासा नंतर केसांना धुऊन घ्या. रात्रभर देखील आपण ठेवू शकता. या मुळे कोंड्यापासून आराम मिळतो. असे शॅम्पू देखील वापरू शकता ज्यामध्ये नारळाचं तेल असत.
2 मीठ -
शॅम्पू करण्यापूर्वी कोंड्याला स्वच्छ करण्यासाठी मीठ अतिशय प्रभावी आहे. मीठाला स्कॅल्पवर किंवा टाळू वर टाकून हळुवार हाताने चोळून घ्या या मुळे मृत त्वचा बाहेर पडेल. काही वेळ चोळल्यावर केस शॅम्पू करून घ्या. आपण अनुभवाल की या उपायामुळे कोंडा कमी होत आहे. जेव्हा देखील आपण शॅम्पू कराल, तेव्हा ही प्रक्रिया अवलंबवा, काहीच काळात कोंड्यापासून सुटका होईल.
3 लिंबाचा रस -
दोन चमचे लिंबाचे रस आपल्या केसांच्या स्कॅल्प ला चोळून चांगल्या प्रकारे मॉलिश करा. एक कप पाण्यात एक लिंबाचा रस मिसळा आता या पाण्याने आपल्या केसांना स्वच्छ करा. असे आपण आठवड्यातून 3 वेळा करावे.
4 नारळाचं तेल आणि लिंबाचा रस -
नारळाच्या तेलात एक चमचा लिंबाचा रस मिसळून कोमट करा. आपल्या केसांना या तेलाची मॉलिश करा. नंतर शॅम्पूने आपले केस धुऊन घ्या. ही प्रक्रिया आपण आठवड्यातून किमान 2 वेळा करावी.