1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By
Last Modified: सोमवार, 7 डिसेंबर 2020 (15:03 IST)

1930 च्या दशकातील लोकप्रिय फिंगर वेव्ह स्टाइल

S waves hair style
नेहमी त्याच-त्या हेअरस्टाइलचा तुम्हाला कंटाळा आला असेल तर 1930 च्या दशकात लोकप्रिय ठरलेली 'एस वेव्ह किंवा फिंगर वेव्ह' स्टाइल तुम्हाला नवा लूक देऊ शकते. या स्टाइलमध्ये घरच्या घरीच केस सेट करता येतात, हे विशेष. नव्या जमान्यात व्हिंटेजचा फील देणार्‍या या स्टाइलविषयी...
 
केस ठेवा ओलसर
सर्वात आधी शॅम्पूने केस स्वच्छ धुवा. केस पूर्णपणे कोरडे करु नका. काहीसे ओलसर केस असतानाच ही स्टाइल जास्ती चांगल्या प्रकारे सेट होते. हेअरस्टाइल अधिक वेळ टिकावी म्हणून जेलचाही वापर करा.
 
केसांचं विभाजन करा
कंगव्याच्या एका बाजूला थोडे अधिक केस घ्या. यामुळे तुमचा भाग एका बाजूने दिसेल. केसांचं विभाजन शक्य तितक्या लांबपर्यंत करा, विभाजनाची रेषा सुंदर आणि सरळ दिसेल याकडे लक्ष द्या. केसांच्या मोठ्या भागाला कंगव्याच्या साहाय्याने समोरच्या बाजूला ओढा. आता केस मागच्या बाजूला ढकला. यामुळे पुढे आणलेले केस आणि मागच्या बाजूचे एकमेकांमध्ये मिसळतील. यानंतर केसांवर क्लॅम्प लावून ते पूर्णपणे वाळू द्या. क्लॅम्प आणि बोटांच्या साहाय्याने केसांचा दुसरा भागही अशाच पद्धतीने सेट करा आणि त्याच्या फिंगर वेव्ह तयार करा. साधारणपणे फिंगर वेव्ह दोन्ही भागांच्या समोरच्या भागातून काढायच्या असतात. केस मोठे असतील तर हेअर रोलरच्या साहाय्याने सॉफ्ट कर्लही बनवता येतील. केसांध्ये क्लॅम्प लावल्यानंतर तुम्ही उर्वरित केसांना कर्ल करू शकता.
 
क्लॅम्प्स काढा
क्लॅम्प काढताना केस ओढले जाणार नाहीत, याची काळजी घ्या. आता तुमच्या केसांमध्ये 'एस वेव्ह' तयार
झालेल्या दिसतील. केस पूर्णपणे कोरडे झाले असतील तर ते सेट झालेले दिसतील. एस वेव्ह सेट झाल्यानंतर केसांमधून कंगवा फिरवू नका. अन्यथा एस वेव्ह लुप्त होतील. 
 
केसांवर मारा हेअर स्प्रे
एकदा केलेली केशरचना टिकावी यासाठी केसांवर हेअर स्प्रे मारा. बाजूच्या आणि समोरच्या केसांवर स्प्रे मारा. यामुळे हेअरस्टाइल अधिक काळ टिकेल.