हेयर ड्रायर वापरत असाल तर या 7 गोष्टींची काळजी घ्या
केस कोरडे करावयाचे आहे मग उन्हात कोरडे कारणे हे चांगले पर्याय आहे. पण जर हवामान ढगाळी पावसाळी किंवा थंडीचे असेल केसांना कोरडे करण्यासाठी ड्रायरचा वापर करावा लागतो. जर आपण नियिमतपणे ड्रायरचा वापर करता तर मग या पासून होणारे तोटे आणि खबरदारी बद्दल जाणून घेणे आवश्यक आहे.
केसांची नवीन केश रचना देण्यासाठी हेयर ड्रायर वापरतात पण ह्याच्या पासून होणारे तोटे देखील त्वरितच दिसून येतात. हेयर ड्रायरचा अत्यधिक वापर केसांच्या नैसर्गिक सौंदर्याला काढून टाकतो. तर ह्याच्या दररोज च्या वापर केल्याने केसांमध्ये कोंडा होणं, क्लिडेंट, निस्तेज आणि कोरडे होणं सारख्या समस्या वाढतात. या मुळे केस रुक्ष आणि निर्जीव होऊन तुटू लागतात. या पासून तोटे होण्याचे एक कारण म्हणजे या मधून निघणारी उष्णता आहे जी केसांच्या मुळाला नुकसान देते आणि केसांना दोनतोंडी करते. खबरदारी काय घ्यावयाची -
1 हेयर ड्रायरचा वापर करताना हे लक्षात ठेवा की केसांपासून याची दुरी 6 ते 9 इंच असावी. असे केले नाही तर केसांमध्ये कोरडेपणा वाढेल आणि ते लवकर तुटू लागतील.
2 ड्रायरचा वापर करण्याच्या पूर्वी केसांमध्ये नरिशमेंट सीरम लावावे, जेणे करून ड्रायरच्या उष्णतेमुळे केसांना काहीही नुकसान होऊ नये आणि केस मऊ व्हावे.
3 आपल्या केसांच्या प्रकारानुसार हेयर ड्रायरचा वापर करणे योग्य राहील. जसे की केस कुरळे आहे, रुक्ष आहे, मऊ आहेत किंवा रेशमी आहेत, त्यानुसार आपल्याला तापमान किंवा वेळेची आवश्यकता असेल.
4 ड्रायर वापरण्यापूर्वी केसांना कंडीशनींग करणे विसरू नका. बऱ्याच वेळा चांगल्या प्रकारे न वापरल्यामुळे केस कोरडे होण्यासह गुंततात, या मुळे ते तुटतात.
5 रुक्ष आणि कोरड्या केसांमध्ये शक्य असल्यास कमी ड्रायर वापरा किंवा कोल्ड ड्रायर वापरा कारण या मध्ये आयन असतात जे पॉझिटिव्ह असतात आणि त्याच्या हवेत उष्णता कमी असते.
6 जर आपल्यासाठी हेयर ड्रायरचा वापर करणे आवश्यक आहे तर केसांना नियमितपणे तेल लावा, जेणे करून केसांना पुरेशे पोषण मिळेल. ड्रायरचा जास्त वापर केल्याने हे केसांमधील पोषण काढतो.
7 केस बळकट आणि पोषित ठेवण्यासाठी आहाराकडे विशेष लक्ष द्यावे. आपल्या आहारात आवळा, हिरव्या पालेभाज्या, ज्यूस, दही इत्यादी समाविष्ट करावे जेणे करून केसांना पोषण मिळेल.