बुधवार, 28 फेब्रुवारी 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 27 ऑगस्ट 2022 (11:32 IST)

Cobra Trailer: चियान विक्रमच्या 'कोब्रा'चा धमाकेदार ट्रेलर रिलीज

चियान विक्रम हे तमिळ चित्रपटसृष्टीतील एक मोठे नाव आहे. त्याचा बहुप्रतिक्षित 'कोब्रा' हा चित्रपट आठवडाभरात प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, आज या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. ट्रेलर खूपच मनोरंजक दिसत आहे आणि नक्कीच तुम्हाला स्क्रीनवर चिकटून ठेवेल. 'कोब्रा' एक अॅक्शन थ्रिलर चित्रपट आहे, ज्यामध्ये चियान विक्रम 25 वेगवेगळ्या अवतारांमध्ये दिसणार आहे. या ट्रेलरला चाहत्यांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.
अजय आर ग्यानमुथु लिखित आणि दिग्दर्शित या चित्रपटाचा टीझरही नुकताच प्रदर्शित झाला, त्यालाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्याच वेळी, आता चित्रपटाचा ट्रेलर देखील समोर आला आहे, जो खूपच प्रेक्षणीय दिसत आहे. ट्रेलरमध्ये विक्रमचे 25 लूकही दाखवण्यात आले आहेत, ज्यामध्ये तो शानदार दिसत आहे. चियान विक्रम या चित्रपटात एका गणितज्ञाची भूमिका साकारत आहे.
 
कोब्रामध्ये चियान विक्रम व्यतिरिक्त श्रीनिधी शेट्टी मुख्य भूमिकेत असून माजी क्रिकेटपटू इरफान पठाण पदार्पण करणार आहे. याशिवाय मिया जॉर्ज, रोशन मॅथ्यू, सरजानो खालिद, पद्मप्रिया, मोहम्मद अली बेग, कनिहा, मिरनालिनी रवी, मीनाक्षी आणि के.एस. रविकुमारही या चित्रपटात सहाय्यक भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट तेलगू, तमिळ आणि हिंदीमध्ये 31 ऑगस्टला रिलीज होणार आहे.