मुंबईच्या ओशिवरा पोलीस स्टेशनमध्ये साहिल खानविरोधात तक्रार
अश्लील कमेंट करणे आणि सोशल मीडियावर तिच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्याप्रकरणी साहिल खानवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय महिलेला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोपही करण्यात आला असून पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या ओशिवरा पोलीस स्टेशनमध्ये साहिल खानविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
दाखल करण्यात आलेल्या एफआयआरचा दाखला देत पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार महिला ओशिवरा परिसरातील रहिवासी असून तिचे फेब्रुवारी 2023 मध्ये जिममध्ये पैशांवरून एका महिलेशी भांडण झाले होते. यावेळी आरोपी महिला आणि साहिल खान यांने तक्रारदार महिलेला शिवीगाळ करत धमकी दिली होती. साहिल खान याने आरोपी महिलेसोबत मिळून तक्रारदार महिला आणि तिच्या कुटुंबीयांच्या विरोधात सोशल मीडियावर अपमानास्पद पोस्ट अपलोड केल्या होत्या. त्यानंतर महिलेच्या तक्रारीवर ओशिवरा पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) विविध कलमांचा समावेश करत साहिल खान आणि त्याच्या सोबतच्या महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस अधिकाऱ्यांचे असेही म्हणणे आहे की, आरोपी महिलेचे तक्रारदार महिलेच्या पतीसोबत प्रेमसंबंध होते आणि तिने पीडितेच्या पतीविरुद्धही पोलिसात तक्रार दाखल केली होती.
Edited by : Ratnadeep Ranshoor