शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : बुधवार, 19 एप्रिल 2023 (16:39 IST)

धक्कादायक !प्लास्टिक पिशवीत चिमुरड्याचा मृतदेह आढळला

baby legs
मुंबईतील माहीम परिसरात बुधवारी पहाटे प्लॅस्टिकच्या पिशवीत एका दोन वर्षाच्या चिमुकल्याचा मृतदेह आढळला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, शिव- माहीम लिंक रोड येथे एका प्लॅस्टिकच्या पिशवित मुलाचा मृतदेह आढळला असल्याचा फोन मुंबई पोलीस मुख्य नियंत्रण कक्षाला आला पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतले. त्या मुलाच्या तोंडातून फेस निघत होता आणि त्याचे हात उंदराने कुरतडले होते. पोलिसांनी मुलाला तातडीने रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणात पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे.  
काही लोकांना फिरतांना पिशवी दिसली आणि त्यांनी पिशवी उघडून पाहता त्यात चिमुकल्याचा मृतदेह आढळले. त्यांनी पोलीस नियंत्रण कशाला फोनने माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून बाळाचे देह ताब्यात घेत रुग्णालयात नेले असता बाळाचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. बाळाचे डोकं आणि मनगटाचा काही भाग उंदराने कुरतडला होता. हे बाळ कुठून आले ह्याचा शोध पोलीस घेत आहे. 
 

 
Edited By- Priya Dixit