शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : बुधवार, 19 एप्रिल 2023 (13:03 IST)

अजितदादांचा निर्णय हा त्यांच्या पक्षाचा किंवा व्यक्तिगत निर्णय असेल-आशिष शेलार

ashish shelar
केंद्रीय स्तरावर जर काही चर्चा असेल तर सार्वजनिक करू शकत नाही. तो मला अधिकारही नाही. पण राजकारणात काहीही घडू शकते. कल्पोकल्पित गोष्टींवर उत्तर देण्यापेक्षा भाजपा आणि आशिष शेलार काँक्रिट करून दाखवू. आम्ही ते दाखवणार अशा शब्दात मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलारांनी भाष्य केले आहे. अजित पवार यांनी दिल्लीत अमित शाह यांची भेट घेतल्याबाबत पत्रकाराने त्यांना प्रश्न विचारला होता. त्यावर ते बोलत होते.
 
आशिष शेलार म्हणाले की, अजित पवारांना त्यांची भूमिका स्पष्ट करावी लागेल. भाजपाला हा प्रश्न विचारणे चुकीचे आहे. राष्ट्रवादीत काय चाललंय त्यांच्या पक्षाला माहिती आहे. अजितदादांचा निर्णय हा त्यांच्या पक्षाचा किंवा व्यक्तिगत निर्णय असेल. भाजपा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसोबात महाराष्ट्रात एकत्र राज्य करतेय. सरकार खंबीर आहे. जनतेची सेवा करतेय. सरकारबरोबर सेवेचे कामही सुरू आहे असं त्यांनी सांगितले.
 
Edited By - Ratnadeep ranshoor