शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: रविवार, 5 जून 2022 (15:45 IST)

बॉलिवूड मध्ये कोरोनाचा शिरकाव !आदित्य रॉय कपूरला कोरोनाची लागण

कोरोना व्हायरसने पुन्हा एकदा लोकांना झपाट्याने घेरायला सुरुवात केली आहे.गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून बॉलिवूड स्टार्सही कोरोनाच्या विळख्यात येत आहेत.अक्षय कुमार आणि कार्तिक आर्यन नंतर आता अभिनेताआदित्य रॉय कपूरलाही कोरोनाची लागण झाली आहे, त्यामुळे अभिनेत्याचे चाहते निराश झाले आहेत. 
 
गेल्या काही दिवसांपासून मुंबईत कोरोना विषाणूच्या प्रकरणांमध्ये मोठी वाढ झाली होती, त्यानंतरच या अभिनेत्याला कोरोनाची लागण झाल्याची बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आदित्यमध्ये कोरोनाची लक्षणे सौम्य आहेत. त्यामुळे तो लवकर बरा होऊ शकतो. आजकाल आदित्य त्याच्या 'ओम: द बॅटल विथ इन' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त होता. हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार असून त्याचा ट्रेलर लॉन्च करण्याची तयारीही सुरू होती. पण आताअभिनेता कोरोना पॉझिटिव्ह झाला असून आता सर्व काम रद्द करण्यात आले आहे. 
 
 आदित्य रॉयला कोरोनाची लागण झाल्यानंतर त्याच्या आगामी 'ओम द बॅटल विथ इन' या चित्रपटाचे प्रमोशन पुढे ढकलण्यात आले आहे.
 
आदित्यच्या आगामी चित्रपटाबद्दल सांगायचे तर, 'ओम द बॅटल विथ इन' हा एक अॅक्शन चित्रपट आहे, ज्याचे दिग्दर्शन कपिल शर्मा यांनी केले आहे आणि अहमद खान निर्मित आहे. या चित्रपटात आदित्यसोबत संजना संघी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट 1 जुलै रोजी प्रदर्शित होत आहे.