शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 24 जुलै 2021 (08:21 IST)

कोर्टाने सुनावलेली पोलीस कोठडी बेकायदेशीर; राज कुंद्राची हायकोर्टात याचिका

अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योगपती राज कुंद्रा याला अश्लील फिल्म निर्मित करणे आणि सोशल मीडियावरील अ‍ॅप्सवर विकणे या आरोपाखाली मुंबई गुन्हे शाखेने अटक केली आहे.राज कुंद्राला कोर्टात हजर करण्यात आले होते सुनावणीदरम्यान न्यायालयाने २७ पर्यंत पोलीस कोठडीत वाढ केली आहे.परंतु आपल्याला सुनावण्यात आलेली पोलीस कोठडी बेकायदेशीर असल्याचा दावा राज कुंद्राने केला असून हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.पोलिसांनी चौकशीसाठी राज कुंद्राची कस्टडी मागितली होती यावर कोर्टाने मान्यता दिली आहे.
 
उद्योगपती राज कुंद्रा आणि त्याचा सहकारी रायन थॉर्पला पॉर्न फिल्म बनवण्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. मुंबई गुन्हे शाखेने कारवाई करत राज कुंद्रासह अन्य ९ जणांना अटक केली आहे.राज कुंद्राच्या पोलीस कोठडीत कोर्टाने ७ दिवसांची वाढ केली आहे.राज कुंद्रा अश्लील फिल्म बनवण्याच्या आणि अ‍ॅप्सवर विकत असल्याचा खुलासा मुंबई गुन्हे शाखेने केला आहे. यावर अधिक तपास करण्यासाठी राज कुंद्राच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी मुंबई गुन्हे शाखेच्या वकिलांनी कोर्टात केली होती यावर कोर्टाने मान्यता दिली आहे.परंतु आपल्याला सुनावण्यात आलेली पोलीस कोठडी बेकायदेशीर असल्याचं राज कुंद्राने याचिकेत म्हटलं आहे.
 
राज कुंद्रा आणि रायन थॉर्पने पॉर्न फिल्म उद्योग करुन कमावलेला पैसा बेटींगमध्ये वापरला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे राज कुंद्राचे येस बँकमधील अकाउंट आणि युनियन बँक ऑफ आफ्रिका या दोन बँकेतील अकाउंटमधील व्यवहाराची पडताळणी करण्यात येणार आहे. राज कुंद्राच्या अडचणी दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. यामुळे राज कुंद्राच्या प्रकरणात आणखी काही मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे. कुंद्राला शुक्रवारी २३ जुलै रोजी कोर्टात हजर करण्यात आले होते. कोर्टात पोलिसांनी चौकशीसाठी ७ दिवसांची पोलीस कोठडी मागिती होती यावर न्यायालयाने मान्यता दिली आहे.