मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 23 जुलै 2021 (12:20 IST)

सलमान खानची पत्नी आणि 17 वर्षाची मुलगी दुबईमध्ये राहते का? भाईजानने दिलं हे उत्तर

बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानचे नाव अनेक बॉलिवूड ब्युटींसोबत जोडण्यात आले पण त्यांचे कोणाशीही संबंध लग्नापर्यंत पोहोचू शकले नाहीत. सलमानचे चाहते अनेकदा विचारतात की, लग्न कधी करणार? प्रत्येक वेळी सलमान या प्रश्नाचे गोळमोळ उत्तर देताना दिसतात.
 
अलीकडेच सलमान खान त्याचा भाऊ अरबाजच्या 'पिंच' मध्ये पाहुणे म्हणून आला होता. या दरम्यान अरबाजने लोकांची ट्वीट वाचली आणि सलमानला जाब विचारला. यादरम्यान एका वापरकर्त्याने सलमानच्या सीक्रेट वेडिंगवर लिहिले आहे.
 
अरबाज खान यांनी कमेंट वाचले त्यात असे लिहिले होते की कुठे लपून बसला आहे भ्याड... भारतातील प्रत्येकाला हे माहित आहे की आपण आपली पत्नी नूर आणि 17 वर्षाची मुलगी यांच्यासह दुबईत आहात. किती दिवस भारतीय लोकांना मूर्ख बनवाल? हे ऐकून प्रथम सलमान आश्चर्यचकित झाला आणि मग त्याने विचारले, 'हे कोणासाठी आहे'?
 
यानंतर अरबाजने सांगितले की ही टिप्पणी केवळ सलमानसाठी केली गेली आहे. यावर सलमान म्हणाला, या लोकांना बरेच काही माहित आहे. हे सर्व चुकीचं आहे. मला माहित नाही की कोणाबद्दल बोलला आणि कुठे पोस्ट केलं. हे कोण आहे असे मला वाटते मला उत्तर द्यायचे आहे. भाऊ, मला बायको नाही.
 
सलमान म्हणाला, मी भारतात राहतो, वयाच्या 9 व्या वर्षापासून गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये राहत आहे. मी या माणसाला उत्तर देणार नाही, मी कोठे राहतो हे संपूर्ण जगाला माहित आहे.