मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 22 जुलै 2021 (08:09 IST)

राज कुंद्रा प्रकरण : नवऱ्याची कर्माची फळ बायकोला भोगावी लागणार ?

सध्या बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचे पती राज कुंद्रा हे सध्या एका बहुचर्चित प्रकरणामुळे चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. मात्र त्यांनी केलेल्या कारनाम्यामुळे सध्या अभिनेत्री शिल्पा शेट्टी हि चांगलीच अडचणीत सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचे पती आणि उद्योजक राज कुंद्रा यांच्याविरोधात पॉर्नोग्राफीचीकेस समोर आली आहे. राज कुंद्राला 23 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
परिणामी शिल्पा शेट्टीला याचा मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचं दिसत आहे. सोशल मीडियावर शिल्पाला मोठ्या प्रमाणात ट्रोलला सामोरं जावं लागत आहे. राज कुंद्रा प्रकरण शिल्पा शेट्टीच्या करिअरवरही परिणाम करू शकतं, अशी शक्यता आहे.
 
शिल्पा शेट्टीचा Super Dancer Chapter 4 चांगला गाजत आहे. याचं नाव सर्वाधिक लोकप्रिय मालिकांमधील यादीत घेतलं जातं. दिग्ददर्शक अनुराग बासू, नृत्यदिग्दर्शक गीता कपूर आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टी कुंद्रा हे तीघे या डान्स रिअॅलिटी शोचे जज आहेत.
मात्र मंगळवारी शिल्पा शेट्टी या शोच्या शूटसाठी आली नसल्याची माहिती समोर आली आहे. त्याशिवाय पुढील काही शोमध्येही शिल्पा शेट्टी दिसणार नसल्याचं समोर आलं आहे. शिल्पा शेट्टीच्या जागी आता करिश्मा कपूर या डान्स रिअॅलिटी शोच्या जजची खुर्ची सांभाळणार आहे, अशी माहिती सूत्रांकडून समजते आहे.
शिल्पा शेट्टीचा आगामी सिनेमावर होऊ शकतो परिणाम :
अभिनेत्री शिल्पा शेट्टी तब्बल 14 वर्षांनी बॉलिवूडमध्ये परतत आहे. ती सध्या 2 बिग बजेट चित्रपटांत झळकणार आहे. लवकरच ती बहुप्रतीक्षित निकम्मा आणि हंगामा 2 या चित्रपटांत दिसणार आहे. शिल्पाचा पती राज कुन्द्राच्या अटकेच्या थेट परिणाम तिच्या चित्रपटावर पडू शकतो.