शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 11 जुलै 2021 (11:44 IST)

पंकजा मुंडे यांचे समर्थक नाराज, भाजपच्या 11 तालुकाध्यक्षांसह 25 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

केंद्रीय मंत्रिमंडळात भाजपच्या खासदार प्रीतम मुंडे यांना संधी न दिल्याने बीड जिल्ह्यात मुंडे समर्थक नाराज असल्याचे चित्र आहे. याप्रकरणी भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामा सत्र सुरू असून जिल्ह्यातील सर्व 11 तालुकाध्यक्षांनी राजीनामा दिला आहे. 
 
आतापर्यंत एकूण 25 पदाधिकऱ्यांनी भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र म्हस्के यांच्याकडे राजीनामा सोपवला आहे. यात भाजपचे जिल्हा सरचिटणीस सर्जेराव तांदळे, भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष विवेक पाखरे यांचाही समावेश आहे.
 
मोदी सरकारने नुकताच केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार केला. यात राज्यातील चार भाजप खासदारांना स्थान मिळाले. पण, प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद न दिल्याने परळीसह बीड जिल्ह्यात समर्थकांनी नाराजी व्यक्त केली आहे.