शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 10 जुलै 2021 (23:00 IST)

राहुल गांधींना राष्ट्रीय नेता बोलल्याचं बैलांना आवडलं नाही : फडणवीस

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसच्या आंदोलनावर तोंडसुख घेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीकास्त्र सोडलं. इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसनं  मुंबईत आंदोलन केलं. यावेळी काँग्रेस नेत्यांनी दिल्लीतील मोदी सरकारवर टीका केली. तसेच इंधन दरवाढीचा निषेध करण्यासाठी बैलगाडीतून आंदोलन करण्यात आलं. मात्र आंदोलनादरम्यान गाडी तुटल्याने मोर्चात एकच गोंधळ उडाला. या घटनेवर देवेंद्र फडणवीस यांनी तोंडसुख घेतलं. तसेच राहुल गांधींना राष्ट्रीय नेता बोलल्याचं बैलांना आवडलं नसल्याचा टोमणा मारला. 
 
राहुल गांधींना राष्ट्रीय नेता बोलल्याचं बैलांना देखील आवडलेलं दिसत नाही. त्यामुळे ती बैलगाडी तुटली.”, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी हाणला. त्याचबरोबर पंकजा मुंडेबाबतही त्यांनी स्पष्टीकरण दिलं. “पंकजा मुंडे नाराज नाहीत. यावर आम्ही दोघांनी स्पष्टीकरण दिलं आहे. त्यामुळे इतरांना जी काही पतंगबाजी करायची आहे. ती करू द्या.” असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.