शनिवार, 5 ऑक्टोबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बीड , शनिवार, 10 जुलै 2021 (20:14 IST)

भाजप पदाधिकाऱ्यांचे राजीनामा सत्र सुरूच, बीड जिल्ह्यातील 11 तालुकाध्यक्षांचा राजीनामा

केंद्रीय मंत्रिमंडळात भाजप खासदार प्रीतम मुंडे (Pritam Munde) यांना स्थान न मिळाल्यामुळे मुंडे भगिनी समर्थकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. बीडमध्ये राजीनामा सत्र सुरुच असून भाजपचे विविध पदाधिकारी नाराजी व्यक्त करत राजीनामा देत आहेत. यापूर्वी 14 भाजप समर्थकांनी राजीनामा दिल्यानंतर आता बीड जिल्ह्यातील भाजपच्या सर्वच 11 तालुकाध्यक्षांनी राजीनामे दिले आहेत. आतापर्यंत एकूण 25 पदाधिकाऱ्यांनी राजीमाना दिला आहे. बीडमधील या राजीनामासत्रामुळे भाजपला चांगलाच धक्का बसला आहे. 
 
सर्वच 11 तालुकाध्यक्षांचा राजीनामा
मोदी सरकार म्हणजेच केंद्रीय मंत्रिमंडळाचा नुकताच विस्तार झाला. यामध्ये महाराष्ट्रातील चार नेत्यांना स्थान मिळाले. मात्र, खासदार प्रितम मुंडे यांना कोणतेही मंत्रिपद दिले गेले नाही. याच कारणामुळे बीडमधील भाजप पदाधिकारी नाराज आहेत. याच नाराजीतून बीड जिल्ह्यातील सर्वच भाजप तालुकाध्यक्षांनी राजीनामा दिलाय. यामध्ये परळीसह एकूण 11 तालुकाध्यक्षांचा समावेश आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडेंवर अन्याय झाल्याने हे पदाधिकारी नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे. नाराज पदाधिकाऱ्यांनी भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्याकडे राजीनामा सोपविला आहे. या 11 तालुकाध्यक्षांच्या राजीनाम्यानंतर भाजपला रामराम ठोकणाऱ्या पदाधिकाऱ्यांची संख्या आता 25 वर पोहोचली आहे.
 
बीड: भाजप पदाधिकाऱ्यांचे राजीनामा सत्र सुरूच
बीड जिल्ह्यातील 11 तालुकाध्यक्षांचा राजीनामा
परळीसह सर्वच तालुकाध्यक्षांचा भाजपला रामराम
भाजप नेत्या पंकजा मुंडेंवर अन्याय झाल्याने पदाधिकारी नाराज
भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्याकडे सोपविला राजीनामा
आतापर्यंत 25 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा