शुक्रवार, 15 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 10 जुलै 2021 (15:39 IST)

रोहित पवार यांनी ट्विट करत भाजपवर सोडले टीकास्त्र

Rohit Pawar tweeted and castigated BJP maharashtra news regional marathi news in marathi webdunia marathi
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधत फडणवीस यांचं विधान हास्यास्पद असल्याचं म्हटलं आहे. रोहित पवार यांनी ट्विट करत भाजपवर टीकास्त्र डागलं आहे. “खोटं बोलायचं आणि रेटून बोलायचं ही भाजप नेत्यांची जुनी सवयच आहे. पेट्रोलवर लावण्यात येणाऱ्या करातले १२ रुपये राज्यांना मिळतात असं हास्यास्पद विधान भाजपकडून पुण्यात करण्यात आलं. देशात इतर कुठंही ही चलाखी चालून गेली असती पण महाराष्ट्रात नाही,”असं रोहित पवार यांनी ट्विटमधून म्हटलं आहे. यामध्ये त्यांनी एक वस्तुस्थिती सांगणारा एक व्हिडिओ देखील ट्विट केला आहे.
 
“केंद्र सरकार आकारत असलेल्या पेट्रोल वरील करात राज्याला किती पैसे मिळतात? तर केंद्र सरकार पेट्रोलवर आकारत असलेल्या ३२.९० रुपयांपैकी महाराष्ट्राला केवळ साडे तीन पैसे मिळतात. तरी केंद्र सरकारचे अपयश लपवण्यासाठी आपण मात्र राज्याला १२ रुपये मिळत असल्याचे सांगता,” असा टोला रोहीत पवार यांनी फडणवीसांना लगावला आहे. विरोधकांना साडेतीन पैशाच्या ठिकाणी १२ रुपये दिसत असतील तर याला काय म्हणावं? सगळीकडं अधिवेशनातील बाराचाच आकडा दिसत असेल तर त्याला इलाज नाही. दिवसाढवळ्या जेष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत असं धडधडीत खोटं बोलणं कुठल्याही नेतृत्वाला शोभणारं नाही, असा टोला देखील रोहित पवार यांनी लगावला.