शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 10 जुलै 2021 (08:36 IST)

सर्व दुकाने सायंकाळी सात वाजेपर्यंत खुली ठेवा : आमदार शिरोळे यांची मागणी

रस्त्यातील गर्दी कमी होण्यासाठी शहरातील सर्व दुकाने, बाजारपेठा दररोज सकाळी सात ते सायंकाळी सात वाजेपर्यंत खुली ठेवावीत,अशी मागणी भाजप आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी केली आहे.
 
पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोविड आढावा बैठक विधानभवनात आज झाली. त्यावेळी आमदार शिरोळे बोलत होते.नागरिकांनी कोविड नियमावलीचे काटेकोर पालन  करावे. नियम मोडणाऱ्यांवर प्रशासनाने पोलीसांनी कडक कारवाई करावी. दिल्लीमध्ये याच पद्धतीने कोविड साथ नियंत्रणात आणण्यात आली, असे आमदार शिरोळे यांनी सांगितले.
 
जे नागरिक दोनदा कोविड पॉझिटिव्ह झाले आहेत आणि दोनदा कोविड पॉझिटीव्ह होऊन मृत्यूमुखी पडले अशा नागरिकांची वेगळी यादी शासनाने करावी. कोविड प्रतिबंधक लसीचे दोन डोस पूर्ण झाले आहेत, अशा नागरिकांना प्रवासासाठी आरटीपीसीआर टेस्टचे बंधन नसावे, अशा सूचना आमदार शिरोळे यांनी केल्या.