गोकुळकडून दूध खरेदी-विक्री दरात वाढ
गोकुळ दूध संघानं दूध खरेदी दरात वाढ केली आहे. म्हैशीच्या दुधाला 2 रुपये, तर गायीच्या दुधाला १ रुपयाची वाढ करत असल्याची घोषणा पालकमंत्री सतेज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. दूध खरेदी दरवाढ ११ जुलैपासून लागू होणार असल्याचं सांगितलं. दूध खरेदी दर वाढीमूळे दूध उत्पादकांना दिलासा मिळणार आहे. तर दुसरीकडे कोल्हापूर जिल्ह्याबाहेरील भागात दूध विक्री दरातही वाढ करण्यात आली आहे, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.
कोल्हापूर जिल्हा वगळता इतर ठिकाणी दूध विक्री दरात ही दोन रुपायांची वाढ होणार असल्याची घोषणा हसन मुश्रीफ यांनी केली आहे. जिल्हा बँकेकडून भूमिहीन शेतकऱ्यांना २ म्हैशीपर्यंत विनातारण कर्ज देणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. गोकुळचा वीस लाख लिटर संकलनाचा प्रयत्न आहे आणि आम्ही तो टप्पा लवकरच गाठणार आहे, असं हसन मुश्रीफ म्हणाले आहेत. गोकुळ दूध संघ शेतकऱ्यांना सध्या म्हशीच्या दुधाला आहे ३९ रुपये तर गाईच्या दुधासाठी २६ रुपये दर देत आहे.
राज्यात गोकुळचे दूध महागणार
गोकुळ दूध संघाकडून शेतकऱ्यांना ११ जुलैपासून म्हैशीच्या दूध खरेदी दरात २ रुपये आणि गायीच्या दुधाच्या दरात १ रुपयाची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. तर, कोल्हापूर वगळता राज्यातील इतर भागात दूध विक्री दरातही २ रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईसह राज्यात जिथं जिथं गोकुळच्या दुधाची विक्री केली जाते, तिथल्या ग्राहकांना दूध खरेदीसाठी अधिकचै पैसे मोजावे