बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 9 जुलै 2021 (23:02 IST)

पहिल्या दिवसापासून कोणाला माहीतीय ५५-५४ चा मुख्यमंत्री होईल

महानगर पालिका त्रिशंकूच पाहिजे हे लक्षात घ्या, ४०- ४५ जागा जिंकलो की १०० टक्के महापौर आपलाच. आपण फार मोठं स्वप्न बघत नाही की, शंभर येतील दीडशे येतील, तसे येणार नाहीत. हे आपल्याला माहिती आहे. महापौर आमच्याशिवाय होणार नाही…जसं आम्ही म्हणालो, मुख्यमंत्री आमचाच….झाला की नाही…झालाच, पहिल्या दिवसापासून कोणाला माहीतीय ५५ – ५४ चा मुख्यमंत्री होईल. असे दोन चार पत्ते इथं हातात घ्या असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलत सत्ता कशी आणायची याचे धडे दिले. पिंपरी-चिंचवडमध्ये शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते संबोधित करत होते. 
 
यावेळी, संजय राऊत म्हणाले की, माझ्या अख्ख्या आयुष्यात मंत्रालयात तीन वेळेस गेलो. मी मंत्रालयात जात नाही, काही नसतं मंत्रालयात. महानगर पालिका, जिल्हा परिषदा ही आपली ताकद आहे. पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या ४०- ४५ जागा जिंकलो की शंभर टक्के महापौर आपलाच. महानगर पालिका त्रिशंकूच पाहिजे हे लक्षात घ्या. आपण फार मोठं स्वप्न बघत नाहीत. की, शंभर येतील दीडशे जागा येतील. तसे येणार नाहीत हे आपल्याला माहिती आहे. पण, महापौर आमच्याशिवाय होणार नाही..जस आम्ही म्हणालो, मुख्यमंत्री आमचाच….झाला की नाही…झालाच, पहिल्या दिवसापासून कोणाला माहीतीय ५५- ५४ चा मुख्यमंत्री होईल. असे दोन-चार पत्ते इथं (पिंपरी-चिंचवड) मध्ये हातात घ्या. ३०- ४० जागा निवडून आणून महापौर करता येईल. अन्यथा दुसरा पर्याय आहे. असे म्हणत त्यांनी सत्ता कशी आणायची हे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना लक्षात आणून दिले.