1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified शुक्रवार, 9 जुलै 2021 (09:29 IST)

मुबंईत आज लसीकरण बंद राहणार

देशात कोरोना लसीकरण सुरु आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे. सध्या लसींचा साठा पुरेसा उपलब्ध नसल्यामुळे काही ठिकाणी लसीकरण केंद्रावर लसीकरण बंद केले आहे.आज देशाची आर्थिक राजधानी मुंबईत देखील लसींचा साठा पुरेसा उपलब्ध नसल्याने मुंबईतील शासकीय व महापालिका केंद्रावर लसीकरण बंद राहण्याची माहिती मुंबईच्या महापालिकेने दिली आहे. 
 
लसीचे डोस उपलब्ध झाल्यानंतर नागरिकांना सूचना देण्यात येईल अशी माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे. सध्या लसींच्या तुटवड्यामुळे लसीकरणात अडथळे येत आहे आणि नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.लसीकरण उपलब्ध झाल्यास त्याची सूचना नागरिकांना देण्यात येईल.मुंबई महापालिकेने ही माहिती दिली आहे.