बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 9 जुलै 2021 (23:04 IST)

सत्ताधाऱ्यांमधील नेत्यांना बायकोनं मारलं तर ते उद्या म्हणतील यात केंद्र सरकारचा हात

शिवसेना खासदार संजय राऊत सर्वज्ञ नाहीत. राऊत यांना सर्व काही समजतं हा तुमचा गैरसमज असल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हणत संजय राऊत यांना चिमटा काढला आहे. मोदी सरकारच्या नव्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये सहकार खातं अमित शाह यांच्याकडे ठेवल्यामुळे संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली होती. फडणवीसांनी या टीकेवर भाष्य केलं आहे. सत्ताधाऱ्यांधील नेत्यांना बायकोनं मारलं तर ते उद्या म्हणतील यामध्ये केंद्र सरकारचा हात आहे असा टोलाही देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. देवेंद्र फडणवीस पुण्यात एका कार्यक्रमाला उपस्थित होते या कार्यक्रमादरम्यान त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती.
 
फडणवीस म्हणाले संजय राऊतांना सर्व गोष्टी माहीत आहेत असं तुम्हाला वाटत? तेंच पंडित आहेत. त्यांना सर्वकाही समजतं त्यांनाच संविधान समजत हा तुमचा गैरसमज आहे. केंद्र सरकारनं आतापर्यंत अनेक वर्ष एनसीडीच्या माध्यमातून हजारो कोटी रुपये राज्य सरकारला दिले आहेत. ते कशाच्या अखत्यारित दिले होते? केंद्र सरकारने दूध संघापासून ते सूत गिरण्यांपर्यंत मदत केली असल्याचे फडणवीस यांनी सांगितले आहे. तसेच राऊतांना सर्व काही कळतं असं तुम्हाला वाटत असेल पण ते खरं नाही असा खोचक टोला फडणवीस यांनी लगावला आहे.