गुरूवार, 21 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 9 जुलै 2021 (23:08 IST)

गोकुळ दूध संघाने दूध उत्पादकांना मोठा दिलासा देत ग्राहकांना झटका दिलाय

Gokul Dudh Sangh
आता दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून घेण्यात येणाऱ्या दूध खरेदी दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतची घोषणा गोकूळ दूध संघाचे नेते पालकमंत्री सतेज पाटील आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली आहे. 
 
त्यानुसार दूध संघ आता उत्पादक शेतकऱ्यांना म्हशीच्या दूध दरात लीटरमागे 2 तर गायीच्या दूधामागे 1 रुपयांनी खरेदी दरात वाढ देणार आहेत. या निर्णयाची अंमलबजावणी ही येत्या 11 जुलैपासून करण्यात येणार आहे.  गोकूळ दूध संघाने व्यवस्थापण खर्चात कमी करून दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केलाय. 
 
एका बाजूला दूध संघाच्या निर्णयामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय. तर दुसऱ्या बाजूला ग्राहकांना महागाईची झळ सोसावी लागणार आहे. गोकूळने खरेदी दरासह दूध विक्री दरातही वाढ करण्याचा निर्णय घेतलाय. त्यानुसार आता राज्यात एक लीटर दूधामागे 2 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ कोल्हापुरचा अपवाद वगळता संपूर्ण राज्यात लागू असणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणीही 11 जुलैपासून करण्यात येणार आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वीच अमूलनेही दूध दरात वाढ केली होती.