1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 10 जुलै 2021 (08:04 IST)

हा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्वाधिक उंचीचा पुतळा

औरंगाबाद मधील क्रांती चौक येथे उभारावयाच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुर्णाकृती पुतळयाची उद्योग, खनिकर्म आणि मराठी भाषा विभाग मंत्री तथा औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी चित्रकल्पक आर्ट स्टुडिओ नऱ्हे- धायरी पुणे येथे आज पहाणी केली.

यावेळी देसाई म्हणाले, चित्रकल्पक आर्ट स्टुडिओचे  दिपक थोपटे व त्यांच्या सहकार्यांनी बनवलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचाअश्वारुढ पुर्णाकृती पुतळा हा एकवीस फुट उंच व बावीस फुट लांब आणि सहा टन वजनाचा आहे. हा राज्यातच नव्हे तर देशात सर्वाधिक उंचीचा पुतळा ठरेल.हा पुतळा अतिशय रेखीव व देखीव असा झालेला आहे. या पुतळयाचे काम लवकरच पूर्ण होईल. क्रांती चौक औरंगाबाद येथे उभारण्यात येणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा आदर्श असा शिवपुतळा ठरेल अशा भावनाही देसाई यांनी यावेळी व्यक्त केल्या.

यावेळी आमदार अंबादास दानवे, आमदार संजय क्षीरसाठ,माजी महापौर नंदकुमार घोडेले, औरंगाबाद महानगरपालिकेचे प्रशासक अस्तिककुमार पांडे, शहर अभियंता  पानझडे,चित्रकल्पक आर्ट स्टुडिओचे दिपक थोपटे यांच्यासह शिवप्रेमी नागरिक व पदाधिकारी उपस्थित होते.