शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 10 जुलै 2021 (23:02 IST)

भास्कर जाधव यांचा जेवढा उपयोग करायचा तेवढा तिघांनी केला : आशिष शेलार

विधानसभा अध्यक्ष कोणाला करावं हा महाविकास आघाडीचा अंतर्गत प्रश्न आहे. भास्कर जाधवांना अध्यक्ष करायला शिवसेनेचं समर्थन आहे का? मला माहिती नाही. भास्कर जाधव यांचा जेवढा उपयोग करायचा तेवढा तिघांनी केला आहे. आता भास्कर जाधवांना काही मिळेल असं कोणत्याही राजकीय शहाण्या माणसाला दिसत नाही.” असं  पुण्यात माध्यमांशी बोलताना भाजपा नेते आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.
 
भाजपा नेते आशिष शेलार यांनी आज माध्यमांशी बोलताना विविध मुद्य्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली. ओबीसी आरक्षण, मुंबई लोकलसह केंद्रीय मंत्रिमंडळात खासदार प्रितम मुंडे यांना स्थान न देण्यात आल्यावर पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलेली भूमिका आदी मुद्यांवर शेलार यांनी प्रतिक्रिया दिली.
 
ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर बोलताना शेलार म्हणाले, “ओबीसींची राजकीय आरक्षण केवळ महाविकासआघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे गेलं आहे. ओबीसी राजकीय आरक्षणाबाबत राज्य सरकार दमदार पाऊलं टाकताना दिसत नाही. राज्य सरकार नेमकं काय करतंय? यावर आमचं लक्ष आहे.”