शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: बुधवार, 14 जुलै 2021 (08:26 IST)

पतीच्या आत्महत्येप्रकरणी पत्नी,सासूसह सात जणांवर गुन्हा दाखल

पत्नी,सासू तसेच राहत्या इमारतीच्या बिल्डरच्या त्रासाला कंटाळून पतीने आत्महत्या केली. याबाबत सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 25 जून रोजी मध्यरात्री च-होली खुर्द येथे घडली.
 
पत्नी स्नेहल योगेश शिंदे, सासु विजया चंद्रकांत माने, चेतन चंद्रकांत माने, सुमन किरण माने, किरण महादेव माने, अभिजीत किरण माने, बिल्डर मेहता अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
 
याबाबत सुखदेव विलास शिंदे (वय 35, रा. धनकवडी, पुणे) यांनी सोमवारी (दि. 12) आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचा भाऊ योगेश विलास शिंदे (वय 36) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा भाऊ योगेश शिंदे याला घरगुती भांडणावरून पत्नीने त्रास दिला. तसेच ते राहत असलेल्या सोसायटीचे चेअरमन असताना त्याच्याकरवी सोसायटीमधील फ्लॅट धारकांकडून बिल्डिंगच्या खाली पार्किंगची सोय करून देण्यासाठी प्रत्येकी एक लाख रुपये घेतले.

पैसे घेऊन कुठलीही पार्किंगची सुविधा उपलब्ध केली नाही. याचा मानसिक त्रास झाल्याने योगेश शिंदे यांनी आत्महत्या केली. योगेश यांना आत्महत्या करण्यास आरोपींनी प्रवृत्त केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.