मंगळवार, 16 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: सोमवार, 12 जुलै 2021 (15:36 IST)

सुट्टीच्यादिवशी आयुक्तांचा दणका, 44 अधिकाऱ्यांच्या केल्या बदल्या

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील स्थापत्य, विद्युत,आरोग्य विभागातील अधिका-यांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये 3 सहशहर अभियंता, 8 कार्यकारी अभियंता, 29 उपअभियंता आणि 4 सहायक आरोग्य अधिकारी अशा 44 अधिका-यांचा समावेश आहे.याबाबतचे आदेश आयुक्त राजेश पाटील यांनी सुट्टीच्या दिवशी रविवारी काढलेत.अधिकारी, कर्मचा-यांनी 15 दिवसाच्या आत बदली ठिकाणी रुजू व्हावे; अन्यथा प्रशासकीय कारवाईचा इशारा आयुक्तांनी दिला आहे.
 
प्रशासनाने एकाच विभागात अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या अधिका-यांची माहिती मागविली होती. त्यानुसार एकाच विभागात अनेक वर्ष कार्यरत असलेल्या अधिका-यांच्या बदल्या करण्यात आल्या.
 
सह शहर अभियंता मकरंद निकम यांच्याकडे बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण, अतिक्रमण निर्मुलन, अशोक भालकर यांच्याकडे स्मार्ट सिटी, ड व ह क्षेत्रीय कार्यालय, पंतप्रधान आवास योजना, ईडब्लूएस आणि सतीश इंगळे यांच्याकडे झोपडपट्टी निर्मुलन व पुर्नवसन, क्रीडा,उद्यान स्थापत्य विभागाची जबाबदारी सोपविली आहे.कार्यकारी अभियंता आबासाहेब ढवळे क क्षेत्रीय कार्यालय, राजेंद्र राणे पाणीपुरवठा व जलनि:सारण संजय भोसले, (बांधकाम परवानगी) आणि संजय घुबे यांची बांधकाम परवानगी विभागात बदली केली.
 
विद्युत संवर्गातील कार्यकारी अभियंता शशिकांत मोरे यांची क क्षेत्रीय कार्यालय, संजय खाबडे यांची फ क्षेत्रीय कार्यालय, नितीन देशमुख यांची मुख्य कार्यालय आणि प्रवीण घोडे यांची अ क्षेत्रीय कार्यालयात बदली केली आहे. तर, उपअभियंता लता बाबर यांची इ क्षेत्रीय विद्युत कार्यालय आणि बाळू लांडे यांची अ क्षेत्रीय विद्युत कार्यालयात बदली केली आहे.
 
स्थापत्य विभागातील 27 उपअभियंत्यांच्याही बदल्या केल्या आहेत. सुनिल शिंदे क क्षेत्रीय, नरेश रोहिला मुख्य स्थापत्य, विजय भोजने बांधकाम परवानगी, दिपक पाटील ग क्षेत्रीय पाणीपुरवठा, विजय जाधव पाणी पुरवठा, मोहन खोंद्रे स्थापत्य मुख्य, सुभाष काळे नगररचना, चंद्रशेखर धानोरकर बीआरटीएस, वैभव पुसाळकर क्रीडा स्थापत्य, सुनिल पाटील स्थापत्य मुख्य, सुनिल नरोटे ड क्षेत्रीय स्थापत्य, लक्ष्मण जाधव ई क्षेत्रीय, संध्या वाघ ग क्षेत्रीय, देवेंद्र बोरावके स्थापत्य उद्यान, राजेद्र शिंदे फ क्षेत्रीय,सतीश वाघमारे स्थापत्य मुख्य,भाऊसाहेब साबळे नगररचना, विनय ओव्हाळ ड क्षेत्रीय, महेश तावरे ग क्षेत्रीय कार्यालय,जयकुमार गुजर ह क्षेत्रीय स्थापत्य,रविंद्र भोकरे पाणीपुरवठा,बाळासाहेब शेटे अ क्षेत्रीय, प्रकाश सगर क क्षेत्रीय,नरेश जाधव पर्यावरण,राजेंद्र क्षीरसागर उद्यान स्थापत्य,राजकुमार सुर्यवंशी नगररचना आणि विजयकुमार शिंदे यांची पाणीपुरवठा व जलनि:सारण विभागात बदली केली आहे.
 
सहायक आरोग्य अधिकारी गणेश देशपांडे यांची क क्षेत्रीय कार्यालय महादेव शिंदे ब क्षेत्रीय, कुंडलिक दरवडे अ क्षेत्रीय आणि बाबासाहेब कांबळे यांची आरोग्य विभागात बदली केली असून त्यांच्याकडे अतिरिक्त आरोग्य कार्यकारी अधिकारी पदाचा पदभार कायम ठेवला आहे.
 
अधिका-यांनी बदलीचे ठिकाणी रुजू होण्यास तात्काळ कार्यमुक्ती करावे. बदली दिलेल्या विभागात 12 जूलैपर्यंत रुजू होवून रुजू झाल्याच्या अहवालाची एक प्रत प्रशासन विभागाकडे सादर करावी. आदेशाच्या दिनांकापासून 15 दिवसात कार्यभार हस्तांतर करुन तसा अहवाल संबंधित विभाग प्रमुखांना द्यावा; अन्यथा अशा कर्मचा-यांवर प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, असे आयुक्त राजेश पाटील यांनी बदली आदेशात स्पष्ट केले आहे.