शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: रविवार, 11 जुलै 2021 (12:05 IST)

पुण्यात नवले पुलाजवळ विचित्र अपघात, ट्रकने 8 वाहनांना धडक दिली

मुंबई बंगळुरू महामार्गावर ट्रकचालकाचे नियंत्रण सुटल्याने वडगाव बुद्रूकच्या नवले पुलानजीक हायवेवर विचित्र अपघात झाला आहे. या अपघातात एका जणाचा मृत्यू झाला आहे. तर 3 जण जखमी झाले आहे.
 
मुंबई बंगळुरू महामार्गावर साताराकडून मुंबईच्या दिशेने निघालेल्या माल ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने समोर असलेल्या आठ वाहनांना धडक दिली. या अपघातात ४ चारचाकी, ३ रिक्षा वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून यातील जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ही घटना शनिवारी सकाळी नवले पुल येथे घडली. शनिवारी सकाळी साडे सात ते 8 वाजेच्या सुमारास नवले पुलाजवळ हा विचित्र अपघात घडला.
 
सिंहगड रस्ता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साताराकडून मुंबईच्या दिशेने निघालेल्या माल ट्रकच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असून याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यानंतर पोलिसांनी जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले.
 
साताऱ्याच्या दिशेकडून मुंबईच्या दिशेने भाजीपाला घेऊन निघालेला माल ट्रक ( क्रमांक : डी डी ०१ सी ०४६७ ) सकाळी नवले पुल व वडगांव पुल येथील हॉटेल विश्वास समोर आला असता चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे ट्रकने समोरच असणाऱ्या ४ चारचाकी वाहनांना व ३ रिक्षाला जोरदार धडक दिली, त्यामध्ये काहीजण जखमी झाले आहेत. तर ८ गाड्यांचे नुकसान झाले आहे. सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक अंकुश कर्चे व कर्मचारी घटनास्थळी पोहोचले असून जखमींची माहिती घेत आहेत. सकाळी झालेल्या या अपघातामुळे बराच वेळ वाहतूक कोंडी झाली होती. जखमींना जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या ट्रकच्या धडकीत या आठही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.