मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Updated : सोमवार, 12 जुलै 2021 (09:58 IST)

पुणे विद्यापीठात पीएचडी करायची आहे? मग हे वाचाच

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पीएचडीच्या प्रवेश प्रक्रियेसंदर्भातील प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे ज्यांना विद्यापीठातून पीएचडी करायची आहे त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे वृत्त आहे. पीएचडी प्रवेशासाठी होणारी परीक्षा (पेट) येत्या २२ ऑगस्ट रोजी होणार आहे. ही प्रवेश परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतली जाईल. या प्रवेश परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना १२ जुलैपासून अर्ज करता येणार आहेत. येत्या ३१ जुलैपर्यंत अर्जाची मुदत आहे. प्रवेश परीक्षेचा निकाल २४ ऑगस्ट रोजी विद्यापीठाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध केला जाणार आहे. प्रवेश परीक्षा २ तासांची राहणार आहे.

सर्वसाधारण गटातील विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होण्यासाठी ५० टक्के गुण तर आरक्षित जागांवरील विद्यार्थ्यांना ४० टक्के गुण आवश्यक असतील. प्रवेश परीक्षा ही दोन भागांमध्ये असेल. पहिल्या भागात संशोधनासाठी (रिसर्च मेथॉडॉलॉजी) ५० गुण आणि विषय आधारीत ५० गुण अशा प्रकारे १०० गुणांची ही परिक्षा असेल.
अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी खालील लिंकवर क्लिक करावे
http://bcud.unipune.ac.in/phd_entrance/applicant/login.aspx