मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: सोमवार, 12 जुलै 2021 (08:25 IST)

शहरात सोमवारी 16 केंद्रांवर मिळणार ‘कोव्हॅक्सीन’ लस;आठ केंद्रांवर गरोदर महिलांसाठी राखीव डोस

पिंपरी चिंचवड शहरात सोमवारी  लसीकरण सुरू आहे. शहरात सोमवारी 8 केंद्रांवर 18 ते 44 या वयोगटातील नागरिकांना तर 8 केंद्रांवर 45 वर्षांपेक्षा अधिक वयोगटातील नागरिकांना ‘कोव्हॅक्सीन’ लस मिळणार आहे. सर्व लसीकरण केंद्रांवर दिव्यांग व तृतीयपंथी लाभार्थींना लसीकरणासाठी प्राधान्य दिले जाईल. तसेच गरोदर महिलांसाठी आठ केंद्रांवर प्रत्येकी 50 डोस शिल्लक राहणार आहेत.
 
सोमवारी ‘कोव्हॅक्सीन’ लसीचा वय 18 ते 44 वर्षे वयोगटामधील लाभार्थींना फक्त पहिला डोस पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या 8 कोविड 19 लसीकरण केंद्रावर सकाळी 10 ते सायंकाळी पाच या कालावधीत मिळणार आहे.
 
कोविन अ‍ॅपवर बुकिंग केलेल्या नागरिकांचे 100 टक्के लसीकरण केले जाईल. अ‍ॅपवर ऑनलाईन बुकिंग करण्यासाठी सोमवारी सकाळी आठ वाजता स्लॉट बुकिंग ओपन होणार आहे.
 
खालील आठ केंद्रांवर 200 लाभार्थींच्या क्षमतेने 18 ते 44 वयोगटातील लाभार्थ्यांना ‘कोव्हॅक्सीन’ लस मिळेल –
# सावित्रीबाई फुले प्रायमरी स्कूल, भोसरी
# कै.ह.भ.प. प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरीयल हॉस्पीटल,, आकुर्डी
# यमुनानगर रुग्णालय
# आचार्य अत्रे सभागृह वाय. सी. एम रुग्णालयाजवळ
# अहिल्याबाई होळकर सांगवी मनपा शाळा
# खिंवसरा पाटील हॉस्पिटल, थेरगाव
# नवीन जिजामाता रुग्णालय
# क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले (जुने तालेरा) रुग्णालय, चिंचवड
 
सोमवारी फक्त वय 45 वर्षा पेक्षा जास्त वयोगटामधील लाभार्थ्यांना आणि HCW व FLW यांना ‘कोव्हॅक्सीन’चा पहिला डोस व दुसरा डोस (पहिल्या डोस नंतर 28 दिवस झालेल्या लाभार्थ्यांना) 8 लसीकरण केंद्रावर देण्यात येणार आहे.
 
‘कोव्हॅक्सीन’ लस मिळणारी ठिकाणे –
# प्राथमिक शाळा 92, मोरेवस्ती, म्हेत्रे वस्ती
# ईएसआयएस हॉस्पिटल, मोहननगर, चिंचवड
# मासुळकर कॉलनी आय हॉस्पिटल
# नवीन भोसरी रुग्णालय
# निळू फुले नाट्यगृह, सांगवी
# अण्णासाहेब मगर शाळा, पिंपळे सौदागर
# पिंपळे निलख इंगोले मनपा शाळा, पिंपळे निलख दवाखान्याजवळ
# प्रेमलोक पार्क दवाखाना
 
वय 45 वर्षा वरील लाभार्थी यांचे लसीकरण हे लसीकरण केंद्रांना उपलब्ध करून दिलेल्या लसीच्या क्षमतेनुसार ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अ‍ॅप या पद्धतीने करण्यात येईल.
 
वय 45 वर्षांपुढील लसीकरण करण्यात येणाऱ्या केंद्रावर सोमवारी (दि. 5) सकाळी आठ वाजले नंतर टोकन वाटप करण्यात येईल. नागरिकांनी वेळेआधी लसीकरण केंद्रावर गर्दी करु नये, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे.
 
सोमवारी खालील आठ केंद्रांवर 50 लाभार्थींच्या डोस गरोदर महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. या केंद्रांवर ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अ‍ॅप या पद्धतीने लसीकरण करण्यात येईल.
# सावित्रीबाई फुले प्रायमरी स्कूल, भोसरी
# कै.ह.भ.प. प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरीयल हॉस्पीटल,, आकुर्डी
# यमुनानगर रुग्णालय
# आचार्य अत्रे सभागृह वाय. सी. एम रुग्णालयाजवळ
# अहिल्याबाई होळकर सांगवी मनपा शाळा
# खिंवसरा पाटील हॉस्पिटल, थेरगाव
# नवीन जिजामाता रुग्णालय
# क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले (जुने तालेरा) रुग्णालय, चिंचवड