बोगस मतदार दिसले तर मनसे स्टाईल ने कारवाई करण्याचा संदीप देशपांडे यांचा इशारा
राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने 15 जानेवारी 2026 रोजी मतदान आणि 16 जानेवारी 2026 रोजी निकाल जाहीर होण्याची तारीख जाहीर केली आहे. मात्र मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचा आरोप मनसेने केला आहे.
मतदार याद्यांमध्ये असलेला घोळ सोडवण्याच्या आधीच निवडणूक जाहीर झाली आहे, पण आता ज्या ठिकाणी बोगस मतदार आढळेल त्याला मात्र आम्ही मनसे स्टाईलने कारवाई करण्याचा संदीप देशपांडे यांनी इशारा दिला आहे.
मनसेने मुंबईसह नवी मुंबई आणि ठाणे भागातील बोगस मतदारांविषयी निवडणूक आयोगाला पुरावेही दिले होते, परंतु कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. असा आरोप देशपांडे यांनी केला आहे.
संदीप देशपांडे म्हणाले की,आज निवडणुका जाहीर झाल्या ही आनंदाची बाब आहे. पण मतदार यादीत जो घोळ होत तो सोडवण्याच्या आधी तशाच पद्धतीने आपण निवडणुकीला सामोरे जात आहोत. एक निश्चित सांगतो, जिथे आम्हाला बोगस मतदार आढळला, तिथे आम्ही त्याला आमच्या स्टाईलने ट्रीट करू.
राज्यातील महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकांच्या तारखा आज राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. मतदान प्रक्रिया 15 जानेवारी रोजी पार पडणार असून, त्यानंतर लगेचच 16जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. 29 महापालिका क्षेत्रांमध्ये आजपासून आचार संहिता लागू करण्यात आली आहे.
Edited By - Priya Dixit