गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024 (12:54 IST)

क्राईम पेट्रोल अभिनेता नितीन चौहान यांचे निधन, वयाच्या 35 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मनोरंजन विश्वातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. सुप्रसिद्ध टीव्ही अभिनेते नितीन चौहान यांचे निधन झाले. ते फक्त 35 वर्षांचे होते. अभिनेत्याच्या मृत्यूच्या कारणाबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. नितीन 'दादागिरी 3' या रिॲलिटी शोचा विजेता ठरले होते.
 
नितीन एमटीव्ही स्प्लिट्सविला सीझन 5 चे रनर अप होते. नितीन चौहानने जिंदगी डॉट कॉम, क्राइम पेट्रोल आणि फ्रेंड्स यांसारख्या टीव्ही शोमध्ये काम केले होते. क्राईम पेट्रोलमधून त्याला खूप प्रसिद्धी मिळाली. 2022 मध्ये 'तेरा यार हूं मैं' या टीव्ही शोमध्ये तो शेवटचा दिसला होते. शोचे सहकलाकार सुदीप साहिर आणि सायंतानी घोष यांनी अभिनेत्याच्या मृत्यूची पुष्टी केली आहे.
 
नितीन चौहानची आणखी एक सह-अभिनेत्री विभूती ठाकूर हिने आत्महत्या केल्याचे सांगितले. विभूतींनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, तुमच्या आत्म्याला शांती लाभो. प्रत्येक अडचणीचा सामना करण्याची ताकद तुमच्यात असते तर...शरीराइतकेच मानसिकदृष्ट्या मजबूत असता तर....
नितीन चौहान हा अलीगढचा रहिवासी असून गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईत राहत होता. नितीनचा गुरुवारी 7 नोव्हेंबर रोजी मृत्यू झाला. कुटुंबीयांनी अभिनेत्याचा मृतदेह मुंबईहून अलीगढला नेला.