गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : बुधवार, 6 नोव्हेंबर 2024 (16:27 IST)

वीर-ज़ारा 20व्या वर्धापन दिनानिमित्त आंतरराष्ट्रीय स्तरावर पुन्हा प्रदर्शित, पहिल्यांदाच सौदी अरेबिया, ओमान आणि कतारमध्येही स्क्रिनिंग!

वीर-ज़ारा 20व्या वर्धापन दिनानिमित्त 7नोव्हेंबरपासून 600 स्क्रीनवर आंतरराष्ट्रीय स्तरावर पुन्हा प्रदर्शित होणार, पहिल्यांदाच सौदी अरेबिया, ओमान आणि कतारमध्येही स्क्रिनिंग!
 
यशराज फिल्म्सची आंतरराष्ट्रीय ब्लॉकबस्टर वीर-ज़ारा, ज्याचे दिग्दर्शन महान चित्रपट निर्माते यश चोप्रा यांनी केले आहे, 7 नोव्हेंबरपासून आंतरराष्ट्रीय स्तरावर 600 स्क्रीन्सवर पुन्हा प्रदर्शित होत आहे. विशेष म्हणजे, या वर्धापन दिनाच्या निमित्ताने वीर-ज़ारा पहिल्यांदाच सौदी अरेबिया, ओमान आणि कतारमध्ये प्रदर्शित होणार आहे.
 
शाहरुख खान, प्रीती झिंटा आणि राणी मुखर्जी यांच्यासह वीर-ज़ारा ही भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात आयकॉनिक चित्रपटांपैकी एक आहे. आपल्या प्रदर्शित होण्याच्या वर्षी, भारत, परदेश आणि जगभरात सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट ठरला होता.
 
री-रिलीजमध्ये अमेरिका, कॅनडा, यूएई, सौदी अरेबिया, ओमान, कतार, बहरीन, कुवैत, यूके, आयर्लंड, जर्मनी, ऑस्ट्रिया, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, फिजी, सिंगापूर, मलेशिया आणि दक्षिण आफ्रिका अशा मोठ्या बाजारातही ही फिल्म प्रदर्शित केली जाणार आहे.
 
विशेष म्हणजे, या री-रिलीज प्रिंट्समध्ये पहिल्यांदाच ‘ये हम आ गये है कहां’ हे गाणे देखील समाविष्ट केले जाईल. यापूर्वी हे गाणे चित्रपटातून वगळले गेले होते, पण आता हे गाणे चित्रपटाचा भाग असेल!
 
नेल्सन डिसूझा, उपाध्यक्ष, आंतरराष्ट्रीय वितरण म्हणाले, “
वीर-ज़ारा ला जगभरात एक मोठा फॅन बेस आहे आणि या २०व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आम्ही हा चित्रपट पुन्हा रिलीज करत आहोत, जेणेकरून चाहते जगभरात ही प्रेमकहाणी पुन्हा अनुभवू शकतील. सोशल मीडियावर वाढता उत्साह, तसेच जगभरातील फॅन्सचे रिक्वेस्ट पाहून यशराज फिल्म्सने हा निर्णय घेतला आहे. हा पाऊल आमच्या फॅन्ससाठी एक खास भेट आहे.”