बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 30 ऑक्टोबर 2021 (10:30 IST)

पुनीत राजकुमारच्या शेवटच्या दर्शनासाठी चाहत्यांची गर्दी, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

कन्नड चित्रपटांचा सुपरस्टार पुनीत राजकुमार यांचे शुक्रवारी दुपारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना बंगळुरू येथील विक्रम रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या निधनाच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला आहे. अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर शोक व्यक्त केला. त्यांच्या निधनाची बातमी चाहत्यांना  मिळताच त्यांच्या शेवटच्या दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अनेक भागात कलम 144 लागू करण्यात आले आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनीही रुग्णालयात पोहोचून अभिनेत्याला श्रद्धांजली वाहिली.

पुनीत राजकुमारचे पार्थिव चाहत्यांना पाहण्यासाठी बंगळुरूच्या कांतीराव स्टेडियममध्ये ठेवण्यात आले आहे. रविवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. शुक्रवारी संध्याकाळी पुनीत राजकुमार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी लोकांनी स्टेडियमवर गर्दी केली होती. प्रत्येकाला आपल्या आवडत्या अभिनेत्याला शेवटचे बघायचे होते. 
 
रविवारी अंत्यसंस्कार केले जातील
पुनीत राजकुमार यांच्या पार्थिवावर पूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिली. खबरदारी घेत प्रशासनाने बेंगळुरूमधील दारूची दुकाने दोन रात्री बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस सतर्क आहेत. 
 
कसरत दरम्यान हृदयविकाराचा झटका
असे सांगितले जात आहे की, 46 वर्षीय पुनीत राजकुमार जिममध्ये व्यायाम करत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले, तेव्हा त्यांची प्रकृती खूपच गंभीर होती.

पुनीत राजकुमार यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून दुःख व्यक्त केले. त्याने अभिनेत्यासोबतचा एक फोटोही शेअर केला आहे. यासह राम गोपाल वर्मा, बोनी कपूर, सोनू सूद, अनिल कपूर, अजय देवगण, विवेक ओबेरॉय, तापसी पन्नू, रिचा चढ्ढा, अभिषेक बच्चन, रितेश देशमुख, संजय दत्त यांच्यासह इतर स्टार्सनी सोशल मीडियावर पोस्ट करून शोक व्यक्त केला.