मंगळवार, 7 फेब्रुवारी 2023
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified शुक्रवार, 29 ऑक्टोबर 2021 (15:04 IST)

कन्नड अभिनेता पुनीत राजकुमार यांचे वयाच्या 46 व्या वर्षी हृदयविकाराचा झटक्याने निधन झाले

गेले वर्ष मनोरंजन क्षेत्रासाठी कठीण गेले. यंदाच्या वर्षी देखील मनोरंजन विश्वातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. आता कन्नड चित्रपटसृष्टीतून हृदयद्रावक बातमी येत आहे. प्रसिद्ध अभिनेता पुनीत राजकुमार आता या जगात नाही. पुनीत राजकुमार यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते अवघे 46 वर्षाचे होते. पुनीत राजकुमार यांच्या निधनाने कन्नड चित्रपटसृष्टीसह टीव्ही आणि बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे.
 
मीडियारिपोर्टसनुसार,हृदयविकाराचा झटका आल्याने पुनीत राजकुमार यांना रुग्णालयात आणले होते, तेथे उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. पुनीत राजकुमारला बंगळुरू येथील विक्रम रुग्णालयात दाखल करण्यात आले.
 
पुनीत राजकुमार यांच्या निधनाच्या बातमीने सर्वांनाच हादरवून सोडले आहे. टीव्ही अभिनेत्री एरिका फर्नांडिसने ट्विट करून पुनीत राजकुमार यांना श्रद्धांजली वाहिली आहे. एरिका फर्नांडिसने ट्विटरवर लिहिले की, 'मी सध्या शॉकमध्ये आहे. या बातमीवर विश्वास ठेवणे कठीण आहे. जो आपल्या तब्येतीबद्दल खूप जागरूक असायचा… पुनीत लवकरच निघून गेला…. अप्पू तुमच्या आत्म्याला शांती लाभो.

एरिकाच्या या ट्विटनंतर लोकांना प्रश्न पडतो की, दोघांमध्ये काय संबंध होते? अभिनेत्रीने अनेक साऊथ चित्रपटांमध्ये काम केले आहे. एरिकाने कन्नड चित्रपट निन्निन्दालेमध्ये पुनीत राजकुमार सोबत काम केले होते. एरिका फर्नांडिसशिवाय सोनू सूद, बोनी कपूर, विवेक ओबेरॉय आणि हंसिका मोटवानी यांनी ट्विटरवर पुनीतच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.