मंगळवार, 26 ऑगस्ट 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 24 ऑक्टोबर 2018 (10:45 IST)

‘सीआयडी’ मालिका संपत नाही, लवकरच नव्या रुपात येणार

cult show cid
‘सीआयडी’ हा क्राईम शो लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची चर्चा रंगली होती. परंतु ही मालिका संपणार नसून काही काळ ब्रेक घेणार असल्याचं नुकतंच समोर आलं आहे. येत्या २७ ऑक्टोबर रोजी या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होणार असल्याची चर्चा चाहत्यांमध्ये रंगली होती. त्यामुळे २१ वर्ष यशस्वीरित्या वाटचाल करणारी ही मालिका बंद होणार असल्याचं समजताच चाहत्यांनी ट्विटरवर #SaveCID हा ट्रेंड सुरु केला होता. मात्र सोनी वाहिनीने एक परिपत्रक प्रसिद्ध करुन मालिका बंद होणार नसल्याचं म्हटलं आहे.
 
‘सीआयडी’ हा मालिका संपणार नसून केवळ काही महिन्यांसाठी प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. सीआयडी ही मालिका २७ ऑक्टोबरनंतर काही महिन्यांच्या ब्रेकवर जाणार आहे. मात्र या मालिकेचा नवा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल. विशेष म्हणजे या नव्या भागामध्ये अधिक थ्रिलिंग पाहायला मिळणार आहेत, असं या परिपत्रकात नमूद करण्यात आलं आहे.